Celebrities express their grief on manoj kumar death akshay kumar vivek agnihotri
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांचे निधन झाले आहे. त्यांची वयाच्या ८७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली आहे. मुंबईतल्या धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची अवघ्या इंडस्ट्रीमध्ये देशभक्तीपर चित्रपटासाठी ओळख होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. शिवाय काही सेलिब्रिटींनीही आणि उद्योगपतींनीही त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.
उद्योगपती आनंद महिंद्रा आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणतात की, “मला असं वाटतंय की, मी बालपणातला महत्वाचा हिस्सा गमावलाय. माझ्या कुटुंबीयांनी मनोज कुमार यांचे एकूण एक चित्रपट पाहिले आहेत. मला आठवतंय की, जेव्हा ‘पूरब और पश्चिम’ चित्रपट रिलीज झाला, तेव्हा त्या चित्रपटाने निर्माण केलेली देशभक्तीची भावना अभूतपूर्व होती. मनोज कुमार एका अभिनेत्यापासून प्रत्येक कुटुंबातील सदस्य बनले. आज मी कुटुंबातील एका सदस्याच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. ओम शांती.”
मुझे ऐसा लग रहा है जैसे मैंने अपने बचपन का कोई अहम हिस्सा खो दिया है।
मेरे परिवार ने कभी भी मनोज कुमार की कोई फिल्म मिस नहीं की। और मुझे याद है कि जब फिल्म पूरब और पश्चिम रिलीज हुई थी, इस फिल्म ने जो देशभक्ति का जज्बा जगाया, वह अभूतपूर्व था।
मनोज कुमार एक अभिनेता से हर परिवार… pic.twitter.com/c0NbgKjYE9
— anand mahindra (@anandmahindra) April 4, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये मनोज कुमार यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करत लिहिले, “महान अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार जी यांच्या निधनाने खूप दुःख झाले. ते भारतीय चित्रपटसृष्टीचे एक आदर्श होते. त्यांच्या देशभक्तीच्या भावनेसाठी त्यांना विशेषतः आठवले जात असे. त्यांच्या चित्रपटांमध्ये देशभक्तीचे भाव स्पष्ट दिसून येत. मनोजजींच्या कार्यांनी राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत केली आहे आणि ती पिढ्यांना प्रेरणा देत राहील. या दुःखाच्या वेळी मी त्यांच्या कुटुंबासोबत आणि चाहत्यांसोबत आहे. ओम शांती.”
Deeply saddened by the passing of legendary actor and filmmaker Shri Manoj Kumar Ji. He was an icon of Indian cinema, who was particularly remembered for his patriotic zeal, which was also reflected in his films. Manoj Ji’s works ignited a spirit of national pride and will… pic.twitter.com/f8pYqOxol3
— Narendra Modi (@narendramodi) April 4, 2025
Manoj Kumar: मनोज कुमार यांना ‘या’ गंभीर आजारामुळे गमावावा लागला जीव, रोगाची लक्षणे काय?
मनोज कुमार यांच्या निधनाने अवघ्या बॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार याने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलंय की, “मी त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलोय, ती म्हणजे आपल्या देशाप्रती असलेले प्रेम आणि अभिमान… त्यासारखी दुसरी कोणतीही भावना नाही आणि जर आपण कलाकार ही भावना दाखवण्यात पुढाकार घेणार नाही तर कोण घेणार? एक उत्तम व्यक्ती आणि आपल्या बंधुत्वाच्या सर्वात मोठ्या संपत्तीपैकी एक. भावपूर्ण श्रद्धांजली मनोज सर, ओम शांती”
I grew up learning from him that there’s no emotion like love and pride for our country. And if we actors won’t take the lead in showing this emotion, who will? Such a fine person, and one of the biggest assets of our fraternity. RIP Manoj Sir. Om Shanti 🙏 pic.twitter.com/sr8U4Wkqgq
— Akshay Kumar (@akshaykumar) April 4, 2025
मनोज कुमारने किती संपत्ती सोडली मागे? अभिनय, दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मितीतून केली एवढी कमाई!
दिग्दर्शक आणि निर्माते विवेक अग्निहोत्री यांनीही एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. ते शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हणतात, “भारताचे पहिले खरे आणि समर्पित चित्रपट निर्माते, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते मनोज कुमार आज आपल्याला सोडून गेले. एक खरे देशभक्त आणि दूरदर्शी दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी गाणी ही फक्त मनोरंजनापुरतीच मर्यादित ठेवली नाहीत तर लोकांना त्यांच्याशी जोडले होते. या अभिनेत्याने कोणत्याही धामधुमीशिवाय चित्रपटसृष्टीत देशभक्ती आणली. त्यांच्यासारखे देशभक्त आणि कलाकार कधीही मरत नाहीत. ते कायम आठवणीत आणि मनात राहतात.”
India’s first truly original and committed Indic filmmaker, Dadasaheb Phalke awardee Shri Manoj Kumar ji, left us today.
A proud nationalist.
A staunch Hindu at heart.
A visionary director who gave Indian cinema a new grammar — of song picturisation, of meaningful lyrics, of… pic.twitter.com/Te8PNBbIv5— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) April 4, 2025
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही शोक व्यक्त करत लिहिले,“मनोज कुमार जी एक बहुमुखी अभिनेते होते, जे देशभक्तीपर चित्रपटांसाठी नेहमीच ओळखले जातील. ‘भारत कुमार’ म्हणून ज्यांना लोक प्रेमाने ओळखतात, अशा या कलाकाराने ‘उपकार’, ‘पूरब और पश्चिम’ यांसारख्या चित्रपटांमधून अविस्मरणीय अभिनय साकारला. त्यांच्या कामाने आपली संस्कृती समृद्ध केली असून, त्यांचा वारसा चित्रपटसृष्टीत सदैव जिवंत राहील. त्यांच्या कुटुंबियांना आणि चाहत्यांना माझ्या हार्दिक संवेदना. ओम शांती.” मनोज कुमार यांनी आपल्या अभिनयातून देशप्रेमाचे बीज प्रेक्षकांच्या मनात पेरलेय. त्यांच्या निधनाने एक सुवर्णयुग संपल्याची भावना चाहत्यांमध्ये आहे.
Shri Manoj Kumar ji was a versatile actor, who would always be remembered for making films full of patriotism. Popularly known as ‘Bharat Kumar’ his unforgettable performances in films like ‘Upkaar’, ‘Purab and Paschim’ have enriched our culture and have endeared him to people…
— Rajnath Singh (@rajnathsingh) April 4, 2025
चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेत मनोज कुमार यांना त्यांच्या देशभक्तीवरील चित्रपटांसाठी ओळखलं जातं. उपकार, क्रांती यांसह अनेक चित्रपटांमधून त्यांनी भूमिका केल्या. दिग्दर्शनही केलं. त्यांना भारत कुमार असंही म्हटलं जाई ते याच कारणामुळे. त्यांच्या चित्रपटांमधली गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत. मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे, मोती या गाण्याशिवाय तर १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी हे दोन राष्ट्रीय सण साजरेही होत नाहीत.
मनोज कुमारमुळे आज अमिताभ आहे सुपरस्टार? अभिनेत्याशी संबंधित जाणून घ्या पाच खास गोष्टी!