Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिस दलात खळबळ! रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी, अंमलदार अटकेत

पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस अंमलदारास थेट गांजाची तस्करी करताना तेलंगाना राज्यात पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याला तब्बल 12 किलो गांजा घेऊन जात असताना पकडण्यात आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 28, 2026 | 12:30 AM
पुणे पोलिस दलात खळबळ! रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी, अंमलदार अटकेत

पुणे पोलिस दलात खळबळ! रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी, अंमलदार अटकेत

Follow Us
Follow Us:
  • पुणे पोलिस दलात खळबळ!
  • रेल्वेतून १२ किलो गांजाची तस्करी
  • तेलंगणात पोलीस अंमलदार अटकेत
पुणे : पुणे शहर पोलिस दलातील एका पोलिस अंमलदारास थेट गांजाची तस्करी करताना तेलंगाना राज्यात पकडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्याला तब्बल 12 किलो गांजा घेऊन जात असताना पकडण्यात आले आहे. रेल्वेने तो गांजाची तस्करी करीत होता. नितीन ज्ञानू शिंदे (वय ३३, रा. पुणे) असे पकडण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे. याप्रकरणी तेलंगणा राज्यातील नेकुंडा पोलिस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रविवारी याबाबतची माहिती तेलंगणा पोलिसांनी पुणे पोलिसांना कळवली. मिळालेल्या माहितीनुसार, नितीन शिंदे हे पुणे पोलीस दलातील कर्मचारी असून त्यांची नेमणूक वाहतूक शाखेमार्फत  विश्रामबाग वाहतूक विभागात होती. दरम्यान ते 8 ऑक्टोबर पासून वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यानंतर रविवारी तेलंगणा पोलिसांकडून पुणे पोलिसांना नितीन शिंदे यांना रेल्वेतून 12 किलो गांजाची तस्करी करताना पकडण्यात आल्याची माहिती कळवण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. नितीन शिंदे हे नेमके गांजा घेऊन कुठे येत होते किंवा त्यांच्यासोबत अन्य कोणी आहे का आणि इतर माहिती समजू शकलेली नाही मात्र पुढे पोलीस दलातील कर्मचारीच गांजाची तस्करी करत असल्याचे उघडकीस आल्याने पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा : चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल

एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी पोलीस हवालदारालाच अटक! 

मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीविरोधात कारवाई सुरू असतानाच, पोलीस दलातील एका हवालदारालाच एमडी ड्रग्स विक्रीप्रकरणी अटक झाल्याने खळबळ उडाली आहे. पोलीस हवालदार प्रकाश पवार आणि त्यांचा कथित साथीदार अखिलेश कुमार यांच्याकडून एमडी ड्रग्स, रोख रक्कम, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण १ लाख ३२ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. पोलीस आयुक्त अनिकेत कौशिक यांनी मिरा-भाईंदर अंमली पदार्थमुक्त करण्याचा संकल्प व्यक्त केला असताना, पोलिसांच्याच कर्मचाऱ्यावर अंमली पदार्थ विक्रीचा आरोप झाल्याने या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. मिरा-भाईंदर शहरात अंमली पदार्थांच्या विक्रीचा प्रश्न गंभीर बनलेला असताना, त्याविरोधात कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यावरच एमडी ड्रग्स विक्रीचा आरोप झाल्याने खळबळ उडाली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गांजाची तस्करी करताना पकडण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव काय आहे?

    Ans: नितीन ज्ञानू शिंदे (वय ३३, रा. पुणे) असे पकडण्यात आलेल्या पोलिस अंमलदाराचे नाव आहे.

  • Que: नितीन शिंदे यांच्याकडून किती गांजा जप्त करण्यात आला?

    Ans: नितीन शिंदे यांना रेल्वेने १२ किलो गांजाची तस्करी करताना तेलंगणा राज्यात पकडण्यात आले.

  • Que: नितीन शिंदे यांच्याविरुद्ध कोणत्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला?

    Ans: नितीन शिंदे यांच्याविरुद्ध तेलंगणा राज्यातील नेकुंडा पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: A police has been caught smuggling cannabis in telangana nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल
1

चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल

पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; तब्बल ५ लाख ६४ हजारांच्या नोटांसह चौघांना अटक
2

पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; तब्बल ५ लाख ६४ हजारांच्या नोटांसह चौघांना अटक

Gold Jewellery Theft: रास्ता पेठेत घरफोडी, तर लोणी काळभोरमध्ये पावणेतीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; पुण्यात भीतीचे वातावरण
3

Gold Jewellery Theft: रास्ता पेठेत घरफोडी, तर लोणी काळभोरमध्ये पावणेतीन लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; पुण्यात भीतीचे वातावरण

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात
4

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.