
चिठ्ठीतून अश्लील मागणी, मोटारसायकलला आग; पीडितेच्या छळ प्रकरणी पिंपरी न्यायालयाचा मोठा निकाल
राहुल अंकुश बनसोडे (वय २७, रा. निगडी, पुणे) असे या शिक्षा ठोठावलेल्या दोषीचे नाव आहे. अश्लील आणि शिवराळ भाषेत लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या चिठ्ठ्या पीडितेच्या घरासमोर टाकून विनयभंग केल्याची तसेच तिच्या चुलत्याची मोटारसायकल पेटवल्याची फिर्याद अल्पवयीन पीडितेने एप्रिल २०१४ मध्ये निगडी पोलिसांत दिली होती.
घटनेच्या रात्री साडेतीनच्या सुमारास पीडितेच्या घरासमोर लावलेल्या तिच्या चुलत्याच्या मोटारसायकलला आरोपीने पेटवून दिले होते. धूर पाहून पीडितेसह कुटुंबीय उठले असता त्यांनी आरोपीला तिथे पाहिले. तो तिथून पसार व्हायच्या आधीच शेजाऱ्यांनी त्याला पकडले होते. त्याच्या पँटच्या खिशात एक चिठ्ठी सापडली होती. त्यात पीडितेला अश्लील भाषेत शिव्या आणि धमकी देत लैंगिक सुखाची मागणी करण्यात आली होती. पीडितेच्या कुटुंबीयांनी त्याला पकडून पोलिसात देऊन त्याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. घटनेच्या सहा महिने आधीपासून आरोपी पीडितेच्या घराबाहेर अशा चिठ्ठ्या टाकत होता.
पोलिसांनी ही चिठ्ठी अधिक तपासासाठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे पाठवली होती. त्यातील हस्ताक्षर आरोपीचेच असल्याचा अहवाल आणि साक्ष तज्ज्ञांनी दिली. त्यांची साक्ष या खटल्यात महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षाची बाजू विशेष सरकारी वकील श्रीमती एस एम चौगुले यांनी मांडली. आरोपीने पीडितेला लग्नाची मागणी घातली होती. त्याला तिच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवला होता. त्यानंतर आरोपीच्या आणि पीडितेच्या आईची भांडणे झाली होती. त्या भांडणाच्या रागातूनच खोट्या गुन्ह्यात आरोपीस अडकवले गेल्याचा दावा बचाव पक्षाने केला होता. तो न्यायालयाने ग्राह्य मानला नाही. उपलब्ध पुराव्यांच्या आधारे आरोपीस दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
Ans: न्यायालयाने आरोपीला एकूण पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.
Ans: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, लैंगिक छळ, धमकी आणि मोटारसायकल जाळून नुकसान केल्याचे गुन्हे सिद्ध झाले.
Ans: पिंपरी-चिंचवड सत्र न्यायालयाने आरोपीला शिक्षा सुनावली.