
पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; तब्बल ५ लाख ६४ हजारांच्या नोटांसह चौघांना अटक
सलमान जैनद्दीन राजे (वय ३०, रा. आंबेगाव केडगाव, ता. दौंड) शाफाज फिरोज अन्सारी (वय ३०, रा. नालासोपारा), विशाल विलास गलांडे (वय ३७, रा. सुरुपखन वाडी , ता. माण, जि. सातारा), अभिजित रावसाहेब कांबळे (वय ३०, रा. शिरोळ, जि. कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप तसेच पोलिस हवालदार सचिन अहिवळे, शैलेश सुर्वे, सचिन कदम, कैलास डुकरे तसेच त्यांच्या पथकाने केली आहे.
महात्मा फुले मंडई परिसरात एक संशयित व्यक्ती बनावट नोटा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिस अंमलदार सचिन अहिवळे आणि शैलेश सुर्वे यांना मिळाली होती. त्यांनी ही माहिती वरिष्ठ निरीक्षक नवनाथ जगताप यांना दिली. त्यानुसार पोलिसांनी १४ ऑक्टोबर रोजी महात्मा फुले मंडईच्या पाठीमागे म्हसोबा मंदिराच्या समोरील अंतर्गत रोडवर शुक्रवार पेठेत सापळा रचला. त्यावेळी नमूद रकमेच्या पाचशे रुपयांच्या बनावट नोटा घेऊन आलेल्या सलमान राजेला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पाचशे रुपयांच्या ८०५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या नोटांची दर्शनी किंमत चार लाख दोन हजार ५०० रुपये आहे.
आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचे आणखी तीन साथीदार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सातारा, कोल्हापूर येथे राहणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. यात प्रिंटर, मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, सीपीयू आणि अन्य वस्तूंचा समावेश आहे. साहित्याची किंमत २१ हजार १०० रुपये आहे.
मंडईतून बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस
महात्मा फुले मंडई परिसरात बनावट नोटा घेऊन येणाऱ्या संशयिताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला होता. सुरुवातीला ८०५ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. नंतर आरोपींच्या चौकशीतून आणखी साथीदारांची माहिती मिळाली. पुढील कारवाईत नोटा तयार करण्याचे साहित्य आणि ३२३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. बनावट नोटांच्या निर्मितीपासून वितरणापर्यंतची साखळी शोधण्याचे आव्हान आता पोलिसांसमोर आहे.
Ans: विश्रामबाग पोलिसांनी चौघांना अटक केली.
Ans: ५०० रुपयांच्या १,१२८ बनावट नोटा जप्त केल्या.
Ans: प्रिंटर, मॉनिटर, की-बोर्ड, माऊस, सीपीयू आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.