Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात

बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत चालले आहे. आरोपींकडे पिस्तूल नव्हतेच तर पिस्तूल आले कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 27, 2026 | 03:11 PM
घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात

घटनास्थळी गोळी चाललीच नाही, मग पिस्तूल आले कुठून? राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपासही संशयाच्या भोवऱ्यात

Follow Us
Follow Us:
  • बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर जीवघेणा हल्ला
  • पोलिसांकडून आतापर्यंत पाच जणांना अटक
  • हल्ल्यातील पिस्तूल कुठून आले, याचा शोध सुरू
पुणे : बारामतीतील उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे या प्रकरणातील गूढ अधिकच वाढत चालले आहे. खऱ्या अर्थाने हल्याच्या आठ दिवसानंतर देखील पुणे ग्रामीण पोलिसांना या हल्यामागील गुढ उकलता आलेले नाही. त्यामुळे पोसिसांच्या तपास देखील संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत ५ जणांना बेड्या ठोकल्या असल्या, तरी आरोपींकडे पिस्तूल नव्हतेच तर पिस्तूल आले कोठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

पोलिसांनी केलेल्या दाव्यांनुसार हल्ल्यातील प्रत्यक्ष हल्लेखोर आणि सुपारी देणाऱ्यांना अटक केली आहे. तसेच हल्लेखोरांना सत्तूर आणि पैसे पुरवल्याचेही समोर आले आहे. मात्र, जर हा गोळीबाराचा हल्ला होता, तर मग घटनास्थळावरून गोळीची पुंगळी का गायब झाली ? आणि पोलिसांनी ज्या कांबळे नावाच्या व्यक्तीकडे चौकशी केली, त्याने पिस्तूल पुरवल्याचा इन्कार केला आहे. मग जर पिस्तूल वापरले गेले होते, तर ते या मारेकऱ्यांपर्यंत पोहोचवले कोणी ? या अत्यंत महत्त्वाच्या आणि मूलभूत प्रश्नाचे उत्तर पोलिसांकडे अद्याप नाही. समजा, हल्लेखोरांच्या दाव्यानुसार, पिस्तूल वापरलेच नाही तर घटनास्थळावर पिस्तूल आले कोठून असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हल्ल्यामागील साखळी, सुपारी देणारे आणि आरोपी हाती लागूनही मुख्य शस्त्रच पोलिसांना शोधता आलेले नाही, हा तपासातील मोठा गोलमाल मानला जात आहे. सत्तूर व पैसे देणाऱ्याने पिस्तूल देण्याचे नाकारल्याने, या प्रकरणात पोलिस खरी माहिती लपवत आहेत की गुन्हेगारांचे धागेदोरे शोधण्यात यंत्रणा हतबल ठरली आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

हे सुद्धा वाचा : शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

पोलिस अजूनही काही संशयितांच्या मागावर आहेत आणि नवीन नावे समोर येत आहेत. मात्र, जोपर्यंत हल्ल्यात वापरले गेलेल्या ‘पिस्तुलाचा खरा स्रोत’ उघड होत नाही, तोपर्यंत पोलिसांची ही कारवाई वरवरची आणि दिशाभूल करणारी तर नाही ना, असा संशय सामान्य नागरिकांमधून व्यक्त होत आहे. एकूणच, आरोपी गळाला लागले असले तरी हल्ल्यातील शस्त्राचे रहस्य उलगडण्याचे मोठे आव्हान अजूनही पोलिसांसमोर कायम आहे.

हे सुद्धा वाचा : निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

💡

Frequently Asked Questions

  • Que: राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी किती जणांना अटक झाली आहे?

    Ans: पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.

  • Que: या प्रकरणातील तपासात कोणते प्रश्न अनुत्तरित आहेत?

    Ans: हल्ल्यात पिस्तूल वापरले का आणि ते कोणी पुरवले, हे प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत.

  • Que: पोलिसांसमोर सध्या कोणते मोठे आव्हान आहे?

    Ans: हल्ल्यात वापरलेल्या शस्त्राचा स्रोत शोधणे आणि हल्ल्यामागील संपूर्ण साखळी उघड करणे.

Web Title: The police investigation into the rana suryavanshi attack case is also under a cloud of suspicion nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 03:11 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा
1

Farmers Death: धक्कादायक वास्तव! राज्यात 13928 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; 295 कुटुंबांना अद्याप मदतीची प्रतीक्षा

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन
2

निगडीतील २५ एकर जागेवरील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्प वादात; नगरसेवकांचे आयुक्तांना निवेदन

AAP Sarpanch Son Teerth Singh Shot Dead:पंजाबमध्ये ‘आप’ सरपंचाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या!; जुन्या वैमनस्यातून ८ गोळ्या झाडल्या
3

AAP Sarpanch Son Teerth Singh Shot Dead:पंजाबमध्ये ‘आप’ सरपंचाच्या मुलाची गोळ्या झाडून हत्या!; जुन्या वैमनस्यातून ८ गोळ्या झाडल्या

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू
4

शेतकरी चंद्रकांत शिंदे हत्या प्रकरणात मोठी अपडेट, तिघांना अटक; मुख्य आरोपीचा शोध सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.