Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेलमधून सुटका हाेताच मिरवणूक भोवली; पोलिसांनी परत केली रवानगी

दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला थेट दुग्धाभिषेक घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 09, 2025 | 01:15 PM
जेलमधून सुटका हाेताच मिरवणूक भोवली; पोलिसांनी परत केली रवानगी

जेलमधून सुटका हाेताच मिरवणूक भोवली; पोलिसांनी परत केली रवानगी

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात भुरट्या गुंडांचा उच्छाद सुरु असतानाच आता थेट दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यांमध्ये मोक्का अंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीला थेट दुग्धाभिषेक घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपी अनिकेत अमर सूर्यवंशी (वय २१, रा. नागाळा पार्क, कोल्हापूर) हा मोक्कातील आरोपी असून त्याच्यावर दमदाटी, मारामारी, खंडणी, अवैध शस्त्र बाळगण्याच्या गुन्ह्यात कारवाई झाली आहे. २०२१ पासून त्याची रवानगी कळंबा जेलमध्ये करण्यात आली होती.

अनिकेत सुर्यवंशीची २४ डिसेंबरला जेलमधून सुटका झाली होती. यानंतर त्याच्या स्वागताला पाठिराख्यांपासून ते नातेवाईक सुद्धा हजर होते. यावेळी जेलपासून त्याच्या घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तर दारात रांगोळी काढून खुर्चीवर दुग्धाभिषेकही करण्यात आला. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई कारवाई करून चौघांना अटक करण्यात आली. पोलिसांनी एक कार आणि दोन दुचाकी सुद्धा जप्त केल्या आहेत.
पोलिसांनी अनिकेत अमर सूर्यवंशी, गब्बर उर्फ आदित्य अमर सूर्यवंशी, अनुराग दिलीप राखपसारे, करण उर्फ तुषार सिद्धू कुमठे, सागर कैलास गौडदाब, प्रथमेश कुमार समुद्रे आणि वेदांग शिवराज पोवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गब्बर सोडून इतराच्या पोलिसांनी पुन्हा मुसक्या आवळल्या आहेत. टोळीची दहशत पुन्हा बसवण्यासाठी हा प्रकार केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा : पुण्यातील मसाज पार्लरमध्ये सुरू होता भलताच प्रकार; पोलिसांना खबर लागली अन्…

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकार उघड

आरोपी अनिकेतची सुटका झाल्यानंतर त्याची कळंबा जेलपासून ते घरापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. स्वागतासाठी दारात मंडप घालण्यात आला होता. तर रांगोळी सुद्धा काढण्यात आली होती. यानंतर दारात पोहोचताच त्याचे औक्षण करण्यात आले. इतक्यावर न थांबता दुग्धाभिषेकही करण्यात आला. हा सर्व प्रकार २४ डिसेंबर रोजी घडल्यानंतर सोमवारी सकाळी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला. रिल व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. त्यानंतर व्हिडिओ डीलीट करण्यात आला.

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यातही गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली आहे.

Web Title: A procession has been taken out in kolhapur after the release of the accused from jail nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2025 | 01:14 PM

Topics:  

  • crime news
  • Kolhapur Crime
  • maharashtra

संबंधित बातम्या

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान
1

Bhandara:शाळेच्या मैदानावर आढळल्या भानामतीच्या आकृत्या! पांढऱ्या रेषा, पूजासाहित्य, खिळे, लिंबू यांची सांगड; चर्चेला मोठे उधान

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई
2

अघोरी पूजेच्या आमिषाने भक्तांची आर्थिक लूट; भोंदू बाबा मनोहरच्या टोळीवर मोक्का कारवाई

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान
3

Organ Donation : मृत्यूनंतरही इतरांना जीवनदान! ठाण्यात ४३ वर्षीय ब्रेन-स्टेम डेड व्यक्तीचे यकृत आणि दोन्ही मूत्रपिंड दान

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक
4

108 Ambulance Service: ठाण्यात १०८ ॲम्ब्युलन्स ठरली जीवनदायिनी! रस्त्यातच गर्भवतीची सुरक्षित प्रसूती; वैद्यकीय पथकाचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.