
छत्रपती संभाजीनगरमधील रॅकेटमुळे बिंग फुटले! (Photo Credi t- X)
टॅक्स चोरीची भीती दाखवून अमेरिकेतील नागरिकांना गंडा
अमेरिकन नागरिकांना टॅक्स चोरी, कायदेशीर दंड आणि लोन फ्रॉडची भीती दाखवून हजारो डॉलर उकळणाऱ्या या सिंडिकेटने व्हीपीएन, तुटानोटासारख्या एनक्रिप्टेड ईमेल सर्व्हिस, तसेच डार्कनेट सारख्या बाबींचा वापर केला. डॉलरचे बिटकॉइनमध्ये रूपांतर आणि त्यानंतर भारतात त्याचे क्लीन ट्रान्ट्रॅक्शन, ही संपूर्ण मनी सर्किट पद्धत इतकी गुंतागुंतीची होती की तपास यंत्रणांना त्याचा मागोवा घेणेही अवघड झाले. विशेष म्हणजे, या रॅकेटसाठी उत्तर-पूर्व भारतातून तब्बल १०० पेक्षा अधीक तरुणांना गोपनीयपणे शहरात आणून चार इमारतीत बंदिस्त ठेवण्यात आले होते. पोलिसांच्या नजरेआड एक्या मोठा सेटअप उभा राहणे, ही गंभीर त्रुटी दाखवणारी बाब आहे. डिजिटल जगातील गुन्हे आता सीमाविरहीत झाले आहेत. महाराष्ट पोलिसांनी अमेरिकेतील एफबीआयला संपर्क साधण्याची वेळ येणे, हेच दाखवते की स्थानिक पातळीवर गुन्हे आंतरराष्ट्रीय प्रवास करत आहेत.
देशाची सायबर सुरक्षा संकटात?
आज गुन्हेगाराकडे बीपीएन, बॉट सर्व्हर्स, क्रिप्टो चेन, एनक्रयशन, डार्कनेट यासारखी शस्त्रे आहेत: तर पोलिसांकडे अद्याप पुरेशी तंत्रज्ञानसज्जता नाही. डिजिटल इंडिया जसा विस्तारती आहे, तसतशी सायबर संरक्षण भक्कम करणे ही काळाची गरज बनली आहे. अन्यथा अशा रॅकेट्समुळे केवळ आर्थिक नाही तर राष्ट्रीय सुरक्षेलाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. सायबर सुरक्षा केवळ तांत्रिक प्रान नाही तर तो देशाच्या भविष्यातील सुरक्षिततेचा पाया आहे.
सायबर गुन्हेगार प्रगत, पण पोलिस मागे
दोन्ही प्रकरणांमधून आपली सायबर सुरक्षा संरचना अजूनही अपुरी आणि कमकुवत असल्याची बाब प्रकरशाने समोर आली आहे.
दुसऱ्या कारवाईत Southbook .in नावाच्या पेड बेटिंग वेवसाईटवरून क्रिकेटपासून कॅसिनोपर्यंत ४० पेक्षा जास्त गेम्सवर २४ तास ऑनलाइन सट्टा वालत असल्याचे तपासात स्पष्ट झाले. आरोपीनी क्यूआर कोड, तृतीय पक्षाचे एटीएम कार्ड, यीपीआय आवडी, आणि अनेक ऑनलाइन वॉलेटद्वारे पैसा विविध खात्यांत ट्रान्सफर करून कॅशिंग टीम मार्फत रोख स्वरूपात परत घेतला जात असे, या खात्यांपैकी पाच खाती शहरातील नागरिकांची असल्याचा धक्कादायक तपशीलही समोर आला आहे. केवळ टक्केवारीच्या आमिषाने अनेक युवक या चक्रात गुंतल्याचे स्पष्ट होते.