
धक्कादायक! शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; 2 शिक्षकांवर गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं
कोल्हापूर : कोल्हापुरात केरले इथं शाळेचं गेट पडून ११ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याप्रकरणी आता धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी लघुशंकेसाठी निघालेल्या विद्यार्थ्याच्या अंगावर गेट पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता सीसीटीव्हीमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वरूप माने (वय ११) असे त्या मुलाचे नाव आहे.
कशी घडली घटना?
कुमार हायस्कूलमध्ये स्वरूप माने हा सहावीत शिकत आहे. तो लघूशंकेसाठी जात होता. त्यावेळी शिक्षकांनी त्याला दुरावस्थेत असलेले शाळेचे गेट बाजूला करण्याचे सांगितले. त्यावेळी ते गेट त्याच्या अंगावर पडले. या घटनेत त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयामध्ये रुग्णालयात नेले होते. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शाळेचे गेट पडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याप्रकरणात पालक संतप्त झाले. त्यानंतर शाळा प्रशासनाने हालचाली केल्या. या प्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. करवीर पोलीस स्टेशनमध्ये वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल केला आहे.
हे सुद्धा वाचा : अमरावती हादरलं! भरदिवसा युवकाची चाकूने भोसकून हत्या, नेमकं काय घडलं?
…म्हणून शिक्षकांवर गुन्हा दाखल
शाळेचे लोखंडी गेट दोरीने आणि कापडाने बांधण्यात आले होते. त्याची दुरावस्था झाली होती. त्यानंतर त्याची दुरुस्ती केली गेली नाही. शाळेच्या सीसीटीव्हीमध्ये शिक्षक सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून गेट बाजूला करून घेत असल्याचे दिसत होते. त्यावेळी ते गेट स्वरुप माने याच्या अंगावर पडले. यामुळे त्या विद्यार्थ्यास गेट बाजूला करण्याचे सांगणाऱ्या वंदना रामचंद्र माने आणि कृष्णात शामराव माने या दोघं शिक्षकांवर गुन्हा दाखल केला. स्वरूप माने याच्या मृत्यूमुळे पालक संतप्त झाले. त्यांनी एकच आक्रोश केला. गावातील असंख्य ग्रामस्थ शाळेत पोहचले. त्यावेळी प्रशासनाला त्यांनी जाब विचारत गोंधळ घातला होता. तसेच घोषणाबाजी केली. यामुळे गावात काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
विद्यार्थ्याचा गळा चिरला
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुण्यातही धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील वार्षिक समारंभावरुन वादावादी झाल्यानंतर नववीतील विद्यार्थ्याचा वर्गातच काचेच्या तुकड्याने गळा चिरण्याची धक्कादायक घटना घडली आहे. हडपसर भागातील मांजरी भागतील एका शाळेत ही घटना घडली आहे. याप्रकरणी १४ वर्षीय मुलावर हडपसर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याघटनेत १५ वर्षीय मुलगा जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.