Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ

चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगे परिसरात मध्यरात्री एटीएम फोडून रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 04, 2026 | 11:34 AM
महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ

महाळुंगेमध्ये मध्यरात्री एटीएम फोडले, लाखोंची रोकड लंपास; औद्योगिक पट्ट्यात खळबळ

Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील महाळुंगे परिसरात मध्यरात्री एटीएम फोडून रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवार (दि. २ एप्रिल २०२६) रोजी अज्ञात चोरट्यांनी ‘इंडिया १’ (India 1) बँकेचे एटीएम मशीन फोडून सुमारे १ ते १.५० लाख रुपयांची रोकड चोरून नेली आहे. या घटनेमुळे औद्योगिक पट्ट्यात खळबळ उडाली असून, सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, महाळुंगे येथील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या एटीएम सेंटरवर चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला चढवला. सर्वप्रथम त्यांनी एटीएम केंद्राच्या दरवाजाचे लॉक तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर गॅस कटरसारख्या हत्यारांचा वापर करून मशीन फोडण्यात आले. मशीनमधील कॅश बॉक्स उचकटून त्यातील रोकड चोरट्यांनी लंपास केली. पहाटेच्या सुमारास स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास एटीएम सेंटरचे शटर उचकटलेले व मशीन फोडलेल्या अवस्थेत दिसून आल्याने ही घटना उघडकीस आली.

नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दक्षिण महाळुंगे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात ही चोरी सराईत टोळीने केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, चाकण-महाळुंगे औद्योगिक पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर एटीएम केंद्रे असून अनेक ठिकाणी सुरक्षारक्षक नसल्याचे वास्तव समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर या घटनेमुळे एटीएम सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे. याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : मशिनरी व्यावसायिकाचा निर्घृण खून, निर्वस्त्र अवस्थेत आढळला मृतदेह; डोक्यावर वाराच्या खुणा

एटीएममध्ये मदतीच्या बहाण्याने फसवणूक

पुण्यातून एक घटना समोर आली आहे. एटीएममध्ये पैसे काढण्यास गेलेल्या ज्येष्ठाला भामट्यांनी मदत करण्याच्या बहाण्याने त्यांचे कार्ड घेऊन गोपनीय पिन क्रमांक पाहून त्यांच्याच खात्यातून पैसे काढल्याची घटना घडली आहे. वानवडी परिसरात ही घटना घढली असून, पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आयाज कासम शेख (वय ४०, रा. लोहगाव) याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलमे ३१६ (२) आणि ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, एटीएममध्ये व्यवहार करताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये आणि पिन गोपनीय ठेवावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: A shocking incident has taken place in mahalunge where thieves broke into an atm and stole money in the middle of the night

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 04, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • ATM
  • Chakan News
  • crime news

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
1

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
2

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
3

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
4

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.