
बसस्थानकावर प्रवाशांना हेरून चोरी, महिलांच्या टोळीतील एकीला अटक; 3 गुन्हे उघड
२४ जुलै २०२६ रोजी अहिल्यानगर येथील स्वस्तिक बसस्थानकावर एक प्रवासी बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पर्समधून ३ लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून सुरू होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला. दरम्यान, १४ नोव्हेंबर २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, शिल्पा प्रशांत चव्हाण हिने तिच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शिल्पा प्रशांत चव्हाण (वय २२, रा. निपाणी वडगाव) हिला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान शिल्पाने दिलेल्या माहितीनुसार, बसस्थानक तसेच बसमध्ये प्रवाशांची गर्दी असताना त्यांच्या पर्स आणि दागिन्यांवर लक्ष ठेवून चोरी केली जात असल्याचे समोर आले. तिच्या कबुलीनंतर चोरीचे एकूण तीन गुन्हे उघडकीस आले असून, पोलिसांनी चोरीचा मुद्देमालही हस्तगत केला आहे.
हे सुद्धा वाचा : 40 हजारांची मागणी, 15 हजारांत तडजोड; महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
या प्रकरणातील दीपाली उर्फ गुटी निखील चव्हाण (रा. पाथर्डी), कारली पाल्या चव्हाण (रा. कोरडगाव), कोमल नागनाथ काळे (रा. पाथर्डी रोड, शेवगाव) आणि यास्मिन ठाकुर भोसले (रा. भानसहिवरा, ता. नेवासा) या संशयित सध्या फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. बसस्थानक आणि बसमध्ये प्रवास करताना नागरिकांनी मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
नांदेडमध्ये सराईत टोळीचा पर्दाफाश
नांदेड शहरात भररस्त्यात नागरिकांना अडवून मारहाण करणे, खंजिराचा धाक दाखवून लुटणे आणि महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. बोंडार-हवेली रस्त्यालगतच्या उसाच्या शेतात सापळा रचून एलसीबीच्या पथकाने दोन सराईत आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या अटकेमुळे भाग्यनगर आणि विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दोन जबरी चोरींसह विविध पोलीस ठाण्यांतील सहा दुचाकी चोरीचे असे एकूण आठ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलिसांनी सहा मोटारसायकलींसह तब्बल ५ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
Ans: बसमध्ये चढताना प्रवाशांच्या पर्समधील रोख रक्कम आणि अंगावरील सोन्याचे दागिने चोरी करण्याचे प्रकार ही टोळी करत होती.
Ans: पोलिसांनी आरोपीकडून ६ लाख ११ हजार रुपये किमतीचे ४७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
Ans: या प्रकरणात शिल्पा प्रशांत चव्हाण हिला अटक करण्यात आली असून, तिच्या साथीदारांसह एकूण पाच महिलांची नावे समोर आली आहेत. यातील चार महिला फरार आहेत.