
40 हजारांची मागणी, 15 हजारांत तडजोड; महावितरणचा सहाय्यक अभियंता एसीबीच्या जाळ्यात
तक्रारदार (वय ४०) हे जळगाव शहरातील रहिवासी आहेत. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता तिन्ही संशयितांनी त्यांच्या घरी जाऊन नवीन वीजमीटरची तपासणी केली. मीटर आणि विद्युत उपकरणांचे छायाचित्रही घेतले. त्यानंतर भरत तायडे याने तक्रारदाराला पांडे चौकात बोलावले. तेथे घरातील वीजलोड जास्त असून सर्व्हिस वायर बायपास करून वीजचोरी होत असल्याचे सांगत गुन्हा दाखल न करण्यासाठी आणि कारवाई टाळण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली.
एसीबीच्या या पथकाची कारवाई
नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मेराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली, जळगावचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस हवालदार बाळू मराठे, पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने आणि मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
हे सुद्धा वाचा : घरातून बाहेर पडले अन् परतलेच नाहीत! कळंब तालुक्यात दोन तरुणांच्या अपहरणाने खळबळ
पांडे चौकात रचला सापळा, गुन्हा झाला दाखल
पंचांसमक्ष पडताळणी केली असता भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनी स्वतः सह सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांच्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले. त्यानुसार पांडे चौकात सापळा रचण्यात आला. तायडे याच्या सांगण्यावरून तक्रारदाराने नेमाडे यांच्याकडे रक्कम दिली. नेमाडे यांनी १५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Ans: वीजचोरीची कारवाई टाळण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सहाय्यक अभियंता विशाल नेमाडे यांना एसीबीने रंगेहाथ पकडले.
Ans: सुरुवातीला कारवाई टाळण्यासाठी ४० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर १५ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरले.
Ans: वरिष्ठ तंत्रज्ञ भरत तायडे आणि रवींद्र पाटील यांनाही या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले असून, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.