Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सेल्फीचा मोह जीवावर बेतला! मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 02, 2026 | 04:57 PM
सेल्फीचा मोह जीवावर बेतला! मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

सेल्फीचा मोह जीवावर बेतला! मावळमध्ये एका दिवसात 4 तरुणांचा बुडून मृत्यू

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात शुक्रवारी (दि. १) दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाने झडप घालत जाधववाडी धरणात सेल्फी घेण्याच्या नादात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. याच दिवशी पवना नदी येथेही एका तरुणाचा जीव गेल्याने मावळमध्ये एकाच दिवसात चार जणांचा बळी गेल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणावर ही दुर्घटना घडली आहे. धरणात पोहण्यासाठी उतरल्यानंतर पाण्याची खोली न समजल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अजय गारुडे, अनिकेत पवार आणि संतोष येडके अशी मृत तरुणांची नावे असून ते तिघेही पिंपरी-चिंचवडमधील भोसरी परिसरातील रहिवासी होते. भोसरी एमआयडीसीतील खासगी कंपनीत काम करणारे हे तरुण मूळचे परभणी जिल्ह्यातील होते. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत मावळमध्ये फिरण्यासाठी आले असताना ही दुर्घटना घडली आहे.

दुपारी सुमारे तीनच्या सुमारास हे सर्वजण धरण परिसरात पोहोचले. सुरुवातीला वातावरण आनंदी असताना त्यांनी पाण्यात उतरून सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो घेत असताना अचानक एक तरुण खोल खड्ड्यात घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्याच्या ओढीत अडकले आणि काही क्षणातच तिघेही बुडाले. घटनेनंतर इतर मित्रांनी आरडाओरड केली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. मावळ वन्यजीव रक्षक आणि शिवदुर्ग संस्थेच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दीर्घकाळ शोधमोहीम राबवली. अखेर तिघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले.

घटनेमुळे परिसरात हळहळ

घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र लोणावळा, NDRF आणि तळेगाव दाभाडे अग्निशामक दल यांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांना बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्यांना जनरल हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे येथे दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी तिघांनाही तपासून मृत घोषित केलं. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पर्यटकांनी धरण परिसरात पोहताना विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे MIDC पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पवना नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

दरम्यान, मावळ तालुक्यातील सालुंब्रे-गहुंजे येथील जुन्या दगडी पुलाजवळ पवना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मनोज भारत गौतम (वय २५, मूळ गाव उत्तर प्रदेश) असं मृत तरुणाचे नाव असून, तो साळुंब्रे येथील काळोखे पाईप लाईन कंपनीत काम करत होता. तो पवना नदीत पोहण्यासाठी उतरला होता. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचं आपत्ती व्यवस्थापन पथक आणि शिवदुर्ग मित्र लोणावळा टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तत्काळ शोध आणि बचावकार्य राबवत मृतदेह बाहेर काढला. यानंतर शिरगाव-परंदवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या उपस्थितीत मृतदेह पवना हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

हे सुद्ध वाचा : चाकण हादरलं! 3 वर्षांच्या मुलावर अत्याचार करून निर्घृण खून, नागरिकांमध्ये संतापाची लाट

Web Title: A shocking incident has taken place in maval where four youths drowned to death in a single day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 04:57 PM

Topics:  

  • Death
  • maval news
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Ebola virus : ‘या’ देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला
1

Ebola virus : ‘या’ देशात इबोलाचा कहर, मृतांच्या संख्येने चार हजारांचा आकडा गाठला

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…
2

Pune Crime: ‘माझ्या पत्नीशी का बोलतोस?’; १७ वर्षीय मुलाला पळवले, बर्निंग घाटात मारहाण अन्…

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध
3

Blue Drum case : मेरठ हत्याप्रकरणातील न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल, मुस्कान व साहिलवरील आरोप सिद्ध

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त
4

Maval Sub District Hospital: कोट्यवधी खर्चूनही मावळातील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सुविधा ‘रामभरोसे’; नागरिक त्रस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.