Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणीने तरुणाला भेटायला बोलावले, दोघे कात्रज घाटाकडे निघाले अन्…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटीचं आमिष दाखवून तरुणाला भेटण्यास बोलावले, नंतर कात्रज घाटात जाऊ म्हणत त्याला रस्त्यात थांबवून साथीदारामार्फत लुटल्याचा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 11, 2025 | 01:03 PM
तरुणीने तरुणाला भेटायला बोलावले, दोघे कात्रज घाटाकडे निघाले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

तरुणीने तरुणाला भेटायला बोलावले, दोघे कात्रज घाटाकडे निघाले अन्...; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Follow Us
Close
Follow Us:
  • इंस्टावर ओळख, आमिष अन् ब्लॅकमेलिंग
  • पुण्यात तरुणीने तरुणाला लूटले
  • तरुणीसह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल
पुणे : इंस्टाग्रामवर ओळख अन् त्यातून होणाऱ्या फसवणूक प्रकरणात वाढ होत असतानाच आणखी एक प्रकार उघडकीस आला आहे. इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या तरुणीने भेटीचं आमिष दाखवून तरुणाला भेटण्यास बोलावले, नंतर कात्रज घाटात जाऊ म्हणत त्याला रस्त्यात थांबवून साथीदारामार्फत लुटल्याचा प्रकार घडला आहे. त्याला पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी देखील या टोळीने दिली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तरुणीसह चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २८ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, “पूनम” (नाव बदलले आहे) नावाच्या तरुणीशी तक्रारदार तरुणाची इंस्टाच्या माध्यमातून ओळख झाली होती. दोघेही दररोज सतत चॅटिंग करत होते. काही दिवसांत त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर या तरुणीने जवळीकता निर्माण करण्यास सुरूवात केली. एकेदिवशी पूनमने तरुणाला भेटण्यासाठी कात्रज परिसरात बोलावले. तक्रारदार तरुण देखील दुचाकीवर कात्रजमध्ये आला. दोघांची येथे भेट झाली. काही वेळाने पूनमने कात्रज घाटात जाण्याचा आग्रह धरला. तरुण देखील तिच्या आग्राहपोटी तिला घेऊन घाटाच्या दिशेने निघाला. मात्र, मध्येच एका ठिकाणी तरुणीने गाडी थांबवण्यास सांगितली.

गाडी थांबताच तरुणीचे दबा धरून बसलेले साथीदार आले. त्यांनी तरुणाला धमकी देत येवलेवाडीत नेले. तिथे त्याला मारहाण केली. तसेच, धमकावत पोस्कोनुसार गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ७० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, त्याच्याकडे इतकी रक्कम नव्हती. आरोपींनी त्याच्याकडील १० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले आणि त्याला सोडून दिले. नंतरही या टोळीने तरुणाला उर्वरित पैशांसाठी सतत फोन करून धमकावण्यास सुरुवात केली. सतत येणाऱ्या धमक्या आणि त्रासाला कंटाळून अखेर तरुणाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी पूनम व साथीदारांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. या टोळीचा पोलिस शोध घेत असून, त्यांनी अशा प्रकारे अनेकांना फसविल्याचा संशय आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक थोरात करत आहेत.

Web Title: A shocking incident has taken place in pune where a young woman robbed a young man

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 11, 2025 | 01:03 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
1

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
2

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना
3

Pune Crime: चारित्र्यावर संशय, पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, 15 दिवस घरात कोंडलं आणि…; पुण्यात संतापजनक घटना

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
4

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.