Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु

पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 12, 2026 | 02:23 PM
धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून एकाचा खून; आरोपींचा शोध सुरु

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज खून, लुटमार, खुनाचा प्रयत्न यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे-सातारा रस्त्यावरील श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळ एकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून केल्याची घटना घडली आहे. खून झालेल्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिस शिपाई आकाश कीर्तीकर यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

 

पोलिसांच्या माहितीनुसार, पुणे-सातारा रस्त्यावर श्री शंकर महाराज उड्डाणपुलाजवळील भुयारी मार्गात एकाच्या डाेक्यात सिमेंटचा गट्टू घालून खून करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (११ जुलै) मध्यरात्री घडली. सकाळी एक जण भुयारी मार्गात गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती सहकारनगर पोलिसांना मिळाली. त्यानंतर सहायक आयुक्त गजानन पवार, वरिष्ठ निरीक्षक विट्ठल पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तेथे रक्ताने माखलेला सिमेंटचा गट्टू, फरशी सापडली. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलिसांकडून खून झालेल्या व्यक्तीची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संतोष जाधव तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : संभाजीनगरमध्ये दिवंगत डाॅन बाबा फर्जनच्या घरावर पाेलिसांचा छापा; रोख रकमेसह मोठा शस्त्रसाठा जप्त

मुरुम वाहतुकीच्या वादातून गोळीबार

भाजपचे तालुका सरचिटणीस व संगमनेर तालुक्यातील मालुंजे गावचे माजी सरपंच संदीप घुगे घराजवळ शेतपावली करत असताना त्यांच्यावर दोघांनी दुचाकीवरुन येऊन गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना १ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या गोळीबारात कुठलीही जीवितहानी झाली नाही. घुगे यांना ठार मारण्यासाठी त्यांच्या दिशेने झालेल्या गोळीबारातील गोळी घरातील दरवाजाला छेदून आत गेली. त्यानंतर चौघांनी आपल्या हातातील तलवारीने तोडफोड करून तुला आज जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना पोलिसांना समजताच पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपींचा मागमूस घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर संगमनेर तालुका भाजपाचे सरचिटणीस संदिप घुगे यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपी विशाल हौशीराम खेमनर (रा. अंभोरे, ता. संगमनेर), प्रवीण ठकाजी पुणेकर (रा. डीग्रस, ता. संगमनेर), सुदर्शन शिवाजी श्रीराम व इतर तीन जणांनी हा जीवघेणा हल्ला केला. त्यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: A shocking incident involving a murder has occurred near the flyover in dhankawadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2026 | 02:23 PM

Topics:  

  • crime news
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात
1

Pune MLC Election : पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीसाठी भाजपचा शड्डू! रविंद्र चव्हाण मैदानात

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
3

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज
4

Pune Navratri : पुण्यातील श्री महालक्ष्मी मंदिरात देवीला सुवर्ण मुकुटाचा साज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.