Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड बनावट चावीच्या मदतीने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले आहे. चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2026 | 03:03 PM
बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

Follow Us
Follow Us:

पिंपरी : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता कारमध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड बनावट चावीच्या मदतीने चोरून नेणाऱ्या दोन आरोपींना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अवघ्या आठ तासांत ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखा युनिट-२, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्त कारवाई करत चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १०.५० ते १२.१५ वाजण्याच्या सुमारास पुनावळे येथील संदीप हॉटेलसमोरील सिमेंटच्या सर्व्हिस रोडवर एक कार पार्क करण्यात आली होती. या कारचे दरवाजे बनावट चावीच्या साहाय्याने उघडून त्यामध्ये ठेवलेली ५० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग चोरून नेण्यात आली. याप्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी गुन्हे शाखा आणि रावेत पोलिसांना तातडीने तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली.

सीसीटीव्ही फुटेजमुळे तपासाला दिशा

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये एक व्यक्ती बनावट चावीने कार उघडून ५० लाख रुपये असलेली बॅग घेऊन जात असल्याचे दिसून आले. पुढील तपासात फिर्यादीसोबत मुंबई येथे पैसे आणण्यासाठी गेलेल्या दोन व्यक्तींपैकी चारुदत्त शिवाजी बेंडाले याच्यावर संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मित्राला कारची बनावट चावी देऊन कारमध्ये ५० लाख रुपये असल्याची माहिती दिली आणि चोरी करण्यास सांगितल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणी प्रसाद शिवाजी बनकर (वय २९, व्यवसाय सुपरवायझर, रा. चिंबळी, ता. खेड, जि. पुणे) आणि चारुदत्त शिवाजी बेंडाले (वय ३०, बांधकाम व्यवसाय, रा. निघोजे, ता. खेड, जि. पुणे) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण ५० लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : देहूतील कचरा डेपो प्रश्नावरुन भाजप आक्रमक; दहा दिवसांत सुधारणा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड व बसवराज तेली, पोलीस उपायुक्त (गुन्हे) रोहिदास पवार, परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव, सहायक पोलीस आयुक्त सुदर्शन राठोड आणि वाकड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनील कुन्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिट-२ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप सावंत, मालमत्ता विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या कारवाईत सहभाग घेतला. तांत्रिक विश्लेषण विभागाच्या मदतीनेही तपास करण्यात आला.

Web Title: The pimpri chinchwad police have arrested two accused in a case involving the theft of money nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Theft Case

संबंधित बातम्या

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
1

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
2

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…
3

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष
4

Navi Mumbai: वाहतूक शाखेतला अधिकारी ठरला गुन्हेगारांचा कर्दनकाळ! पनवेल पोलिसांच्या कामगिरीने वेधले लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.