Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

पुणे शहरात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना एका व्यापार्‍यावर भरदिवसा कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यापारी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 25, 2026 | 12:30 AM
दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:
  • दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार
  • स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न
  • नेमकं काय घडलं?
पुणे :  राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. अशातच आता पुणे शहरात गणेशोत्सवाची धामधुम सुरु असताना एका व्यापार्‍यावर भरदिवसा कोयत्याने वार करुन त्यांच्याकडील रोकड लुटण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत व्यापारी गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

 

राजेश दशरथलाल ओसवाल (वय ५८ रा. अलका पॅराडाईज, संभवनाथ जैन मंदिराजवळ सलीसबरी पार्क) असे जखमी झालेल्या व्यापार्‍याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेश ओसवाल हे बुधवारी (दि.२३) दुपारी पावणेतीनच्या सुमारास घरातून ४ लाख रुपये बॅगेत घेउन दुकानात चालले होते. सॅलिसबरी पार्क जवळील जैन मंदिराजवळून जात असताना दुचाकीस्वार तिघा चोरट्यांनी त्यांना अडवून बॅगेतील रोकड हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राजेश यांनी चोरट्यांना विरोध केला असता, चोरट्यांनी त्यांच्या पाठीवर, बरगडीवर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केले.

दरम्यान, आरडाओरड झाल्यामुळे लोक जमा होऊ लागल्याचे दिसताच दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. उपचारासाठी राजेश यांना अ‍ॅडव्हान्टिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

रेकी केल्यानंतर हल्ला; हल्लेखोरांचा शोध सुरू

घटनास्थळी स्वारगेट पोलिसांसह गुन्हे शाखेने धाव घेतली. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार दुचाकीस्वार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, संबंधित व्यापारी राजेश ओसवाल यांची चोरट्यांनी रेकी केली असल्याचा पोलिसांचा संशय आहे. हल्लेखारांच्या शोधासाठी गुन्हे शाखेसह स्वारगेट पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

Web Title: A shocking incident involving an attack on a trader has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
1

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
2

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
3

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
4

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.