Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

दारूच्या नशेत मोबाईलच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ शहरात घडली आहे. एका ३८ वर्षीय मजुराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.२२) सकाळी उघडकीस आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 24, 2026 | 02:58 PM
मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या
  •  दारूच्या नशेत केला हल्ला
  • यवतमाळमधील घटनेनं खळबळ
यवतमाळ :  दारूच्या नशेत मोबाईलच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान थेट खुनात झाल्याची धक्कादायक घटना यवतमाळ शहरात घडली आहे. एका ३८ वर्षीय मजुराचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी (दि.२२) सकाळी उघडकीस आली आहे. शेख मुश्ताक शेख मस्तान (वय ३८ रा. अशोक नगर यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी फिर्यादी अशपाक शेख मुस्ताक शेख (वय १९, रा. अशोकनगर, यवतमाळ) यांच्या तक्रारीवरून यवतमाळ शहर पोलिसांनी सोनू अली शराफत अली (वय २५, रा. अशोकनगर) आणि शेख समीर शेख असलम (वय २३, रा. अलकबीरनगर) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत दोघांना अटक करण्यात आली आहे.

 

मृतक मुस्ताक शेख मस्तान शेख रोजमजुरीचे काम करीत होता. सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजता तो नेहमीप्रमाणे कामासाठी घराबाहेर पडला. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी परतला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी रात्री ११ वाजेपर्यंत त्याची प्रतीक्षा केली. दरम्यान, मुस्ताक शेख हे छोटा बायपास रोडवरील गॅरेजच्या पाठीमागे मृतावस्थेत पडल्याची माहिती मंगळवारच्या सकाळी कुटुंबीयांना मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर दगडाने मारहाण केल्याच्या जखमा दिसून आल्या. तसेच मृतदेहाजवळ रक्ताने माखलेला मोठा दगड आढळून आला. मंगळवारी सकाळी या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, पोलिस निरीक्षक सुरडकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक बिरादार आणि पोलिस उपनिरीक्षक सुजाता मनवर हे घटनास्थळी दाखल झाले.

एसडीपीओ कोळी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी फॉरेंसिक पथकाने घटनास्थळावरुन पाहणी केली. यावेळी मृतकाच्या चेहऱ्यावर दगडाने गंभीर मारहाण केल्याच्या खुणा होत्या. तर घटनास्थळी रक्ताने माखलेला मोठा दगड पोलिसांनी ताब्यात घेतला. शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपींविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

मोबाइलच्या कारणावरून झाली होती शाब्दिक चकमक

मृतकाचा मुलगा फिर्यादी अशपाक शेख याने शहर ठाण्यात दाखल केलेल्या जबानीनुसार, घटनेच्या रात्री सोनू अली आणि शेख समीर हे दोघे पाटीपुरा परिसरात फिरताना मृतकाच्या परिचितांना दिसले होते. याचदरम्यान मुश्ताक शेख आणि या दोन्ही आरोपींमध्ये दारूच्या नशेत मोबाइलच्या कारणावरून शाब्दिक चकमक झाली होती. त्यानंतर दोघांनी संगनमत करून दगडाने हल्ला करून मुश्ताक शेख याचा खून केल्याचे तक्रारी नमुद केले.

Web Title: An incident involving the murder of a young man has occurred in yavatmal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 02:58 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
1

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
2

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
3

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त
4

उच्चशिक्षित दुचाकी चोर जेरबंद, 150 CCTV तपासून वाकड पोलिसांची कारवाई; 8 लाखांच्या 11 दुचाकी जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.