Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

घरात कोणीही आमदार नसताना देखील एका कारवर फॅन्सी नंबरप्लेट लावून त्यावर ‘विधानसभा सदस्य, आमदार’ असा लोगो चिकटवून फिरणाऱ्या गाडी मालकाचा प्रताप पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 24, 2026 | 05:37 PM
गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

पुणे : घरात कोणीही आमदार नसताना देखील एका कारवर फॅन्सी नंबरप्लेट लावून त्यावर ‘विधानसभा सदस्य, आमदार’ असा लोगो चिकटवून फिरणाऱ्या गाडी मालकाचा प्रताप पुणे पोलिसांनी उघडकीस आणला आहे. वारजे माळवाडी वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार समोर आणला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात दिग्वीजय दिपक मोरे (वय ३३, रा. नऱ्हे) असे गुन्हा नोंद झालेल्या गाडी मालकाचे नाव आहे. ही कारवाई २१ सप्टेंबर रोजी करण्यात आली आहे.

 

वारजे वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण जाधव व त्यांचे पथक कर्वे ब्रिज परिसरात पेट्रोलिंग करीत असताना एका शोरूमसमोर काळ्या रंगाची कार वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने उभी असल्याचे आढळले. वाहनावर ‘एमएच.१२.एस.एफ.१२’ असा फॅन्सी नंबर होता. तसेच पुढील काचेच्या डाव्या बाजूला ‘विधानसभा सदस्य, आमदार’ असा लोगो देखील होता. पोलिसांनी ई-चालान मशीनच्या माध्यमातून वाहनमालकाचा मोबाईल क्रमांक मिळवून त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, संबंधित व्यक्तीने वाहन आपले नसल्याचे सांगितल्याने पोलिसांनी काही वेळ प्रतीक्षा केली. नंतर वाहन क्रेनच्या सहाय्याने वारजे वाहतूक विभागात आणून जमा करण्यात आले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी वाहनमालकाकडे अधिक चौकशी केली असता तो स्वतः किंवा त्याच्या कुटुंबातील कोणीही आमदार नसल्याचे निष्पन्न झाले. आमदार असल्याचा आभास निर्माण करून दिशाभूल करण्याच्या उद्देशाने लोगो वापरल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार सरकारतर्फे तक्रार देऊन बीएनएस कलम २०५ तसेच मोटार वाहन कायदा कलम १७७ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

पोलीस असल्याची बतावणीने गंडा, आरोपीला बेड्या

पोलिस असल्याची बतावणी करीत नागरिकांकडून पैसे घेणार्‍या तोतयाला बाणेर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना २३ सप्टेंबरला सकाळी अकराच्या सुमारास बालेवाडीतील लक्ष्मीनगरात उघडकीस आली. वैभव संतोष भोंग (वय २५ रा. पिसेवाडी, माळशिरस, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिस अमलदार मनोज देशमुख यांनी बाणेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Police have taken major action regarding the display of an mlas logo on a vehicle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
1

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
3

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
4

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.