
जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, कुकरीने डोक्यावर वार; दापोडीतील घटनेनं खळबळ
फिर्यादी विलास हजारे हे हॉटेल संजना चायनीजसमोर फोनवर बोलत उभे असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी अजय शिंदे तेथे आला. त्याने अचानक सोबत आणलेल्या धारदार कुकरीने हजारे यांच्या डोक्यावर वार केला, ज्यामुळे ते खाली पडले. आरोपीने पुन्हा वार करण्यास सुरुवात केली असता फिर्यादीचा मित्र दीपक कानडे याने मध्ये पडून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्याला बाजूला ढकलून देत हजारे यांच्या दोन्ही हातांवर कुकरीने सपासप वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
पिस्तुलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न
चिखलीतील जाधववाडी परिसरात जुन्या आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून इनोव्हा कारमध्ये एका तरुणावर पिस्तुलमधून गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत रवी धनाजी घोगरे (वय २६, रा. जांभूळकर चौक, जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपी स्वप्नील कांताराम जाधव (वय ३७) आणि रोशन मच्छींद्र पिंगळे (वय २८, दोघे रा. मधला पेठा, जाधववाडी, चिखली) या दोघांना अटक केली आहे.
जामखेड तालुक्यात भरदिवसा रक्तरंजित थरार!
खर्डा येथील जातेगाव फाट्याजवळ शुक्रवारी (दि. ११) सकाळी सव्वानऊच्या सुमारास दूध वाहतूक करणाऱ्या चालकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. यात गंभीर जखमी झालेल्या चालकाचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला आहे. भरदिवसा घडलेल्या खुनामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तानाजी भास्कर बोराटे (वय ४०, रा. माळेवाडी, ता. भूम) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.