संग्रहित फोटो
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आसेफ जावेद बेग (वय १९, व्यवसाय मजुरी, रा. सावतानगर, गेवराई) हा तरुण दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास गेवराई शहरातील कोल्हेर रोडवरील आधारवड बँकेसमोरून जात होता. त्यावेळी दुचाकीवरून त्याच्या पाठीमागे बसलेल्या एका अनोळखी व्यक्तीने कत्तीने मारहाण केली. या मारहाणीत आसेफ जखमी झाला. मारहाण करणाऱ्या व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेनंतर जखमी तरुणाने पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार गेवराई पोलिस ठाण्यात शनिवार, दिनांक १० रोजी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट झाले नसून, मारहाण करणाऱ्या अनोळखी व्यक्तीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
हे सुद्धा वाचा : ३५ लाखांची सुपारी, तिहेरी हत्याकांडाचा कट; जळगाव पोलिसांनी पाच शार्प शूटर्सना पकडले
पाषाणमध्ये तरुणाचा भोसकून खून
मित्राला दिलेले उसने पैसे परत मागण्यावरून झालेल्या वादानंतर दोघांमध्ये मध्यस्थी करणाऱ्या तरुणाचाच भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. पाषाणमधील आयटीआय ग्राऊंड गेटसमोर ही घटना रात्री उशिरा घडली आहे. सहदेव रामप्रकाश शर्मा (वय ३३, रा. सुसगाव) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात कृष्णा रामप्रकाश शर्मा (वय ३६, रा. सुसगांव) यांनी तक्रार दिली आहे. त्यावरून बंटी उर्फ आशिष चक्रनारायन याच्यासह तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.






