Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

घरगुती भांडणांतून भावजयीने ९ महिन्यांच्या बाळावर राग काढत त्या बाळाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 04, 2026 | 06:01 PM
9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

9 महिन्यांच्या बाळाचे तोंड फेव्हीक्विकने चिटकवण्याचा प्रयत्न; पुण्यात महिलेचं संतापजनक कृत्य

Follow Us
Follow Us:

पुणे : घरगुती भांडणांतून भावजयीने ९ महिन्यांच्या बाळावर राग काढत त्या बाळाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकून त्याला गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत आहेत. याप्रकरणी लोहगाव पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्ताप नबी शेख (वय ३९, रा. कलवड वस्ती, लोहगाव) यांनी लोहगाव पोलिसांत तक्रार दिली आहे.

याप्रकरणी पोलिसांनी सानिया शेख (रा. कलवड वस्ती, लोहगाव), रियाज इमाम हाल्याळ (वय ४८, रा. कांदिवली, मुंबई) आणि हाजी मलंग शेख (रा. कांदिवली, मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार लोहगावमधील कलवड वस्ती येथील त्यांच्या राहत्या घरात ३१ जुलै २०२६ रोजी सकाळी १२ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. फेव्ही क्विकमध्ये सायनोएक्रिलेट हे केमिकल असते. त्यात एथिल सायनोएक्रिलेट स्टेबलाइजर्स आणि थिकनेस वाढविण्यासाठी रसायन टाकले जाते. त्याचा हवेशी संपर्क झाल्याबरोबर ते घट्ट होऊन जोडले जाते.

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्ताप शेख व त्यांचा भाऊ एकत्र राहतात. त्यांच्यात घरगुती कारणावरुन वादावादी झाली होती. या जुन्या भांडणाच्या कारणावरुन सानिया शेख हिने अल्ताप शेख यांच्या ९ महिन्याच्या अली या मुलाच्या तोंडात फेव्ही क्विक टाकले. त्यामुळे या बाळाच्या तोंडात जखमा झाल्या. त्याला उलटी झाल्याने हा प्रकार त्याची आई जैनाब शेख हिच्या लक्षात आला. बाळाचे ओठ चिकटल्यासारखे झाल्याने त्या घाबरल्या. त्यांनी तातडीने आपल्या पतीला फोन करुन हे कळविले. त्यांनी बाळाला ससून रुग्णालयात आणले. तेथे त्याच्यावर आयसीयुमध्ये उपचार करण्यात आले. आता मुलाची तब्येत सुधारत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक मनिषा पाटील यांनी सांगितले.

तक्रारदारांची पत्नी जैनाब शेख हिने सानिया शेख यांना विचारले असताना तिने कोणाला सांगितले तर सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच तिचे नातेवाईक रियाज हाल्याळ, हाजीमलंग शेख हे हॉस्पिटलमध्ये आले. त्यांनी जैनाब शेख यांना मुलगा व्यवस्थित असून मुद्दाम त्यांची मुलगी सानिया शेख यांच्या विरुद्ध तक्रार दिली तर तुला दाखवितो, अशी धमकी दिली. पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

हे सुद्धा वाचा : पत्नी हरवल्याची तक्रार करणारा पतीच निघाला मारेकरी! मृतदेह नदीत फेकला आणि…

Web Title: A shocking incident involving the injury of a small baby has occurred in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 06:01 PM

Topics:  

  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
1

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू
2

शिरुर हादरलं ! पूर्ववैमनस्यातून तरूणावर गोळीबार; लोखंडी पाईपनेही बेदम मारहाण, अखेर मृत्यू

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार
3

लातूरमध्ये परळीच्या तरुणाचा खून! तीक्ष्ण हत्याराने वार करुन संपवलं; नगरसेवकासह तिघे फरार

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर
4

Crime News : नात्याला डाग! लहान भावानेच केला मोठ्या भावाचा खून; धक्कादायक कारणही आलं समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.