काय घडलं नेमकं?
३० जुलैला अंजली सिंह परिस्थितीत बेपत्ता झाली होती. ३१ जुलै रोजी तिचा पती उमेंद्र याने राहिमाबाद पोलीस ठाण्यात ती हरवल्याची नोंद केली. त्याच दिवशी संध्याकाळी गोमती नदीत अंजलीचा मृतदेह आढळून आला. शवागृहात उमेंद्रने मृतदेहाची ओळख पटवली आणि तो तिथून फरार झाला. अंजलीचा भाऊ पुष्पेंद्र याने दिलेल्या तक्रारीनुसार, उमेंद्रचे आरती नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध होते. अंजली या संबंधांना विरोध करत असल्याचे उमेंद्रने प्रेयसी आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तिची हत्या केली.
आरोपीनेच पोलिसांना दिली तक्रार
आरोपीने हत्या केल्यानंतर त्याच्या पत्नीचे दागिने प्रेयसीला दिले. एवढेच नाही तर पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार पतीने स्वतः दिली. गेल्या दोन वर्षांपासून लखनऊमध्ये गाडी चालवत होता. याच दरम्यान त्याची ओळख आरती वर्मा हिच्याशी झाली. आरतीचा 2018 मध्ये घटस्फोट झाला असून ती आपल्या 12 वर्षांच्या मुलासोबत वेगळी राहत होती. या हत्याकांडात सहभागी असलेल्या इतर तीन आरोपींची ओळख पटली असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
चुलत भाऊ-बहिण असल्याने घरच्यांचा विरोध झुगारून केलं लग्न; अवघ्या तीन महिन्यांतच नवविवाहित दांपत्याचा करुण अंत
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेश येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चुलत भाऊ बहिणीचं एकमेकांवर जडलं प्रेम, घरच्यांचा विरोध जुगारून लग्न केलं, मात्र अवघ्या तीन महिन्यात नवऱ्याने आपल्या पत्नीची हत्या केली, नंतर स्वतःही आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव सौरव सविता उर्फ टोनी (२२ वर्ष) असे आहे. ते हत्या झालेल्या तरुणीचे नाव राणी उर्फ शालिनी (१८ वर्ष) असे आहे. मृत सौरव आणि राणी हे दोघेही सचेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कला का पुरवा गावचे रहिवासी होते.
शासकीय कामात अडथळा, मद्यधुंद तरुणाची पोलिसांना धक्काबुक्की; नेमकं काय घडलं?
Ans: गोमती नदीत.
Ans: सर्व्हिलन्स आणि CDR तपासाच्या आधारे.
Ans: आरोपी पती उमेंद्र प्रताप आणि त्याची प्रेयसी आरती वर्मा.






