Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Accident : पुण्यात खासगी बसचा थरार; अधी दोन महिलांना धडक दिली अन् थेट…

बाजीराव रस्त्यावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला आहे. अभिनव चौक मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स एका दुचाकीला धडकून नंतर एका इमारतीला जाऊन धडकली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 11:49 AM
पुण्यात खासगी बसचा थरार; अधी दोन महिलांना धडक दिली अन् थेट...

पुण्यात खासगी बसचा थरार; अधी दोन महिलांना धडक दिली अन् थेट...

Follow Us
Follow Us:

पुणे : बाजीराव रस्त्यावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भल्या पहाटे अपघाताचा थरार घडला आहे. अभिनव चौक मार्गावर भरधाव ट्रॅव्हल्स एका दुचाकीला धडकून नंतर एका इमारतीला जाऊन धडकली. यामध्ये दुचाकीस्वार मायलेकी जखमी झाल्या आहेत. ही घटना गुरुवारी (दि. ३०) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

याप्रकरणी ट्रॅव्हल्स चालक किरण रामभाऊ कचरे (वय ४२) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर, अनुराधा पत्की आणि सुचित्रा पत्की या दोघी जखमी झाल्या आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कचरे स्वारगेटकडून अभिनव चौकातून पुढे जात होता. ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटले आणि नंतर ट्रॅव्हल्सने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघातात दुचाकीवरील दोन महिलांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली. अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील नागरिक आणि सकाळच्या वेळी व्यायामासाठी बाहेर पडलेले लोक मदतीसाठी धावले. खडक पोलिसांच्या मदतीने जखमी महिलांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातानंतर चालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. घटनास्थळी पाहणी करून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. दरम्यान, या धडकेत अत्रे सभागृहाजवळील लोखंडी रेलिंगचेही मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा : आरटीई प्रवेशासाठी 40 हजारांची लाच, खाजगी व्यक्ती एसीबीच्या जाळ्यात; पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक प्रकार

मद्यधुंद कारचालकांने दोन दुचाकींना उडवले

गेल्या काही दिवसाखाली मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: A shocking incident of a private bus accident has taken place in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • Accident News
  • pune news
  • Travels Buses

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.