Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

पुणे-नाशिक महामार्गालगत पिंपळवंडीजवळील कांदळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तुळजाभवानी कलाकेंद्रात शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 09, 2026 | 02:50 PM
महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

Follow Us
Follow Us:

आळेफाटा : राज्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून, अशातच आता पुणे-नाशिक महामार्गालगत पिंपळवंडीजवळील कांदळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तुळजाभवानी कलाकेंद्रात शनिवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराची थरारक घटना घडली आहे. महिलांची बैठक (कला सादर करण्याची वेळ/बैठक) लावण्यावरून झालेल्या तीव्र वादातून चाकण येथील एका तरुणाने थेट गोळीबार केला. या घटनेत ओतूर येथील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कलाकेंद्रात महिलांची बैठक लावण्यावरून चाकण येथील तरुण आणि इतर उपस्थितांमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने संतापलेल्या चाकण येथील तरुणाने पिस्तूल काढून गोळीबार केला. यामध्ये फिरोज कादिर शेख (वय ३१, रा. ओतूर) हा तरुण गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला.

आळेफाटा येथे उपचार सुरू

घटना घडल्यानंतर कलाकेंद्रात घबराट निर्माण हाेऊन पळापळ झाली. जखमी फिरोज शेख याला तातडीने आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली बारामतीतील विकासकामांची केली पाहणी; अधिकाऱ्यांना दिले ‘हे’ निर्देश

संशयित आरोपींचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी कलाकेंद्र परिसराची पाहणी करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. याप्रकरणी संशयित आरोपींचा शोध सुरू असून, पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.

पुण्यातील वाघोलीत व्यावसायिकावर गोळीबार

जमीन खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायिकावर दुचाकीवरून येऊन गोळीबार करत तिघांनी त्यांच्याकडील ११ लाख रुपये किंमतीचे २२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यावसायिक त्यांच्या कारमध्ये होता तरीही चोरट्यांनी त्यांच्या खिडकीजवळ येऊन गोळी झाडली. गोळीबारात काच फुटून त्यांना लागली. गोळीबारात व्यवसायिक संतोष ज्ञानोबा गावडे (वय ५०, रा. गावडेवाडी, शिरसवाडी, ता. शिरुर) हे जखमी झाले आहेत. त्यांच्या तोंडाला गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संतोष यांचे चुलत बंधू दत्तात्रय गावडे (वय ५०) यांनी लोणीकंद पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी तिघा अनोळखी चोरट्यांविरुद्ध आर्म ॲक्टनुसार खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.5) रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास गावडेवाडी शिरसवाडी येथील पंडीत गावडे यांच्या बंगल्यासमोर घडली आहे.

Web Title: A shooting incident has occurred at the kala kendra in kandali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 02:50 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • maharashtra

संबंधित बातम्या

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
1

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
2

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
3

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
4

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.