Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत

Navi Mumbai Crime: १५ सप्टेंबर रोजी कामोठे परिसरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश देत शिवकल्पतरू आर्केड परिसरात सापळा रचला.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 22, 2026 | 08:31 PM
Navi Mumbai Crime: कामोठ्यात ड्रग्जविरोधात पोलिसांची धडक कारवाई; ६.५ ग्रॅम हेरॉईनसह पाच जण अटकेत
Follow Us
Follow Us:
  • खाकीचा दणका! ५ ड्रग्ज तस्कर गजाआड; १.३० लाखांचे हेरॉईन हस्तगत
  • व.पो.नि. संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली धडक कारवाई
  • कामोठे परिसरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर कारवाई 
सावन वैश्य/ नवी मुंबई:  कामोठे परिसरात सुरू असलेल्या अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहारावर नवी मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत ६.५ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. या हेरॉईनची किंमत सुमारे १ लाख ३० हजार रुपये असून, कारवाईत पुरवठादार, विक्रेते व मध्यस्थ अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईमुळे अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

१५ सप्टेंबर रोजी कामोठे परिसरात अंमली पदार्थांची खरेदी-विक्री होणार असल्याची गोपनीय माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश देत शिवकल्पतरू आर्केड परिसरात सापळा रचला.

यावेळी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या महेश शिवलखन सिंग (३४, कामोठे) याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे ६.५ ग्रॅम हेरॉईन आढळून आले. पोलिसांनी हेरॉईन जप्त करून महेश सिंगला अटक केली.

ड्रग्ज माफियांवर थेट प्रहार! Ratnagiri पोलिसांनी सुरू केली ‘ही’ विशेष धडक मोहीम

खारघरपासून सायनपर्यंत पुरवठा साखळी उघड

महेश सिंग याच्याकडे केलेल्या चौकशीतून अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीची माहिती पोलिसांच्या हाती लागली. त्यानंतर पथकाने नवी मुंबई तसेच मुंबई परिसरात कारवाई करत हरप्रितसिंग उर्फ हॅरी, जगदेवसिंग उर्फ जग्गी (३८) आणि जगप्रितसिंग उर्फ निज्जर (२६) यांना ताब्यात घेतले.

हरप्रितसिंग याला खारघर, जगदेवसिंग याला बोरीवली, तर जगप्रितसिंग याला सायन कोळीवाडा परिसरातून अटक करण्यात आली. तसेच हा अंमली पदार्थांचा साठा पुढे कळंबोली परिसरात विक्रीसाठी देण्यात येणार असल्याची माहिती तपासात समोर आल्यानंतर करीयाठिल चकाला एल्विन अँटोनी (३४) यालाही पोलिसांनी अटक केली.

पाचही आरोपींवर गुन्हा; पुढील तपास सुरू

याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या रॅकेटचे आणखी धागेदोरे, अंमली पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि या साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील करीत आहेत.

Drug Free Campaign: तरुणाईला नशेपासून दूर ठेवण्यासाठी ‘कॅम्पस कनेक्ट’; नवी मुंबई पोलिसांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम

निगडे यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी

अंमली पदार्थांच्या अवैध व्यवहाराविरोधात नवी मुंबई पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या नेतृत्वाखालील अंमली पदार्थविरोधी पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे केलेली ही कारवाई विशेष ठरली आहे. अचूक नियोजन, सापळा आणि तपासाच्या माध्यमातून कामोठ्यापासून मुंबईपर्यंत पसरलेली पुरवठा साखळी उघडकीस आणण्यात पथकाला यश आले आहे.

Web Title: New mumbai police conduct major anti drug operation in kamothe five arrested with 65 grams of heroin crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 08:31 PM

Topics:  

  • crime news
  • Drugs
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल
1

Crime News: अल्पवयीन खेळाडूवर कथित लैंगिक अत्याचार; प्रशिक्षकाविरोधात FIR दाखल

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई
2

डीजेचा दणदणाट पडला महागात, नियम मोडणाऱ्या दोन गणेश मंडळांवर गुन्हे दाखल; शिरगाव-परंदवडी पोलिसांची कारवाई

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन
3

नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक
4

Navi Mumbai News: एपीएमसी पोलीस ठाण्याच्या बाप्पाचे पोलीस आयुक्तांकडून दर्शन; जनजागृती देखाव्याचे कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.