Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी पवना नदी पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीपात्रात थेट प्रक्रिया न केलेले घातक रासायनिक पाणी आणि मैलामिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे नदी मोठ्या प्रमाणावर फेसाळली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 23, 2026 | 12:30 AM
पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी पवना नदी पुन्हा एकदा गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. नदीपात्रात थेट प्रक्रिया न केलेले घातक रासायनिक पाणी आणि मैलामिश्रित सांडपाणी सोडल्यामुळे नदी मोठ्या प्रमाणावर फेसाळली असून, चिंचवड येथील केजुबाई बंधाऱ्यावर नदीपात्रात सध्या पांढऱ्याशुभ्र फेसाचे साम्राज्य पसरले आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे पवनेचे अस्तित्व धोक्यात आले असून, नदीतील जलचरांचे जीवन आणि शहरातील नागरिकांचे आरोग्य याविषयी तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

 

केजुबाई बंधाऱ्यावर फेसाचे लोट

चिंचवड परिसरातील केजुबाई बंधाऱ्यावर पवना नदीच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात फेसाचे दाट थर साचले आहेत. नदीपात्रातून वाहणाऱ्या या फेसयुक्त पाण्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची अपुरी क्षमता किंवा थेट नाल्यांद्वारे प्रक्रिया न करता नदीत सोडले जाणारे सांडपाणी, तसेच औद्योगिक वसाहतींमधून रात्रीच्या वेळी नदीपात्रात सोडले जाणारे रासायनिक सांडपाणी यामुळे हा प्रकार वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे.

जलचरांसह नागरिकांचे आरोग्य धोक्यात

नदीत सोडल्या जाणाऱ्या विषारी द्रव्यांमुळे पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण (DO) वेगाने घटण्याची भीती आहे, ज्यामुळे जलचर आणि माशांचा मोठ्या प्रमाणावर जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. केवळ जलजीवनच नव्हे, तर शहरात पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा मुख्य स्रोत पवना नदी असल्याने या भीषण प्रदूषणामुळे साथीचे रोग पसरण्याची व शहरवासीयांच्या आरोग्यावर दूरगामी परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा : नांदेड हादरलं! ५० हजारांच्या हुंड्यासाठी केला छळ; विवाहितेने गळफास घेऊन संपवलं जीवन

कारवाई कधी होणार? पर्यावरणप्रेमींचा सवाल

प्रदूषणाच्या या विदारक दृश्यांनंतर स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमधून संतापाची लाट उसळली आहे. प्रदूषण नियंत्रण यंत्रणा केवळ कागदी नोटिसा बजावून मोकळी होते, प्रत्यक्षात मात्र सांडपाणी आणि विषारी रसायने थेट नदीत सोडणाऱ्या घटकांवर ठोस कारवाई होत नाही, असा आरोप केला जात आहे. नदीपात्रात विषारी सांडपाणी सोडणाऱ्या संबंधित औद्योगिक घटकांचा आणि आस्थापनांचा तातडीने शोध घेऊन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) तसेच महापालिका प्रशासनाने संबंधितांवर कठोर कायदेशीर व फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून आता जोर धरू लागली आहे.

Web Title: The pavana river has become frothy again due to chemical wastewater

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • maharashtra
  • PCMC News
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
1

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
2

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश
3

Pratap Sarnaik: रस्ते अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचे निर्देश

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची
4

Fire Fighter System: राष्ट्रीय महामार्गांवर स्वतंत्र ‘फायर फायटर’ यंत्रणा हवी; टोलसोबत सुरक्षेची जबाबदारीही महत्त्वाची

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.