Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात मोठा अपघात, भरधाव कारची 4 वाहनांना धडक; नागरिकांची कारवर दगडफेक

भरधाव कारने तीन ते चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार पाषाण येथील ननावरे चौक आणि परिसरात घडला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2024 | 01:03 PM
पुण्यात मोठा अपघात, भरधाव कारची 4 वाहनांना धडक; नागरिकांची कारवर दगडफेक

पुण्यात मोठा अपघात, भरधाव कारची 4 वाहनांना धडक; नागरिकांची कारवर दगडफेक

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता भरधाव कारने तीन ते चार वाहनांना धडक दिल्याचा प्रकार पाषाण येथील ननावरे चौक आणि परिसरात घडला आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान, यावेळी संतापलेल्या स्थानिकांनी धडक देणाऱ्या कारवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. पाषाण येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले होते. तर, गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

ननावरे चौकात सर्वप्रथम कारचालकाने एका वाहनाला धडक दिली. तेथे स्थानिक नागरिकांनी कारचालकाला घेरले आणि कार बाजूला घेण्यास सांगितले. मात्र, कारचालकाने तेथून पळ काढला. त्याचा राग आल्याने काही तरुणांनी कारवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली. यात त्या कारच्या काचाही फुटल्या. तसेच, पळून जाण्याच्या प्रयत्नात कारचालकाने काही अंतरावर आणखी तीन वाहनांना धडक दिली. यात संबंधित कारही रस्त्यावर उलटली. तेथे कारचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

अपघाताचे प्रमाण वाढले

पुण्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सोलापूर-पुणे रस्त्यावर भल्या पहाटे वाहन तपासणीसाठी नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एक पोलीस कर्मचारी गंभीररित्या जखमी झाला आहे. तर, दुचाकी चालक तरुणासह त्याची मैत्रिण देखील जखमी झाली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर हडपसर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस कर्मचारी संकेत गांगुर्डे, पोलीस हवालदार बारटक्के, मोटारचालक चेतन सिंग, दुचाकीवरील सहप्रवासी सायली टिंगे अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याबाबत मनोहर भाऊ ओंबासे (वय ३९, रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

हे सुद्धा वाचा : पैसे दे नाहीतर…; पुणे शहरात चोरट्याचा धक्कादायक कारनामा उघड

बसने महिलेला उडवले

सातारा रस्त्यावर भरधाव पीएमपीने दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नातूबाग परिसरात हा अपघात घडला असून, महिला विवाह सोहळ्यावरून घरी निघाली होती. अपघातात महिलेबरोबर असलेली नात गंभीर जखमी झाली आहे. आशाबाई दत्तात्रय साळुंके (वय ५७, रा. हिराबाग, शुक्रवार पेठ, टिळक रस्ता) असे मृत्यू झालेल्या पादचारी महिलेचे नाव आहे. अपघातात साळुंके यांची नात प्रचिती जखमी झाली असून, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी पीएमपी चालक सतीश राजाराम गोरे (वय २७, रा. कोंढणपूर, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल दत्तात्रय साळुंके (वय ३८) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: A speeding car has hit 4 vehicles in pashan area in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 01:03 PM

Topics:  

  • Car Accident
  • maharashtra
  • pune news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट
1

Maharashtra Drought: दुष्काळाच्या यादीबाहेर असूनही पावसाचा दुष्काळ! पुण्यातील ५ तालुक्यांतील ४३ मंडळांत शेतीवर संकट

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा
2

Digital Board: कधीकाळी ब्रशच्या फटकाऱ्यांतून सजायची दुकानाची पाटी; आता डिजिटल बोर्डांनी घेतली जागा

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’
3

Cricket: “वय ५० पार, उत्साह मात्र तरूणपणीचाच! पुण्यात रंगणार ‘रायझिंग स्टार करंडक’चा टी-२० थरार’

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
4

NCC च्या विस्ताराला पायाभूत सुविधांचा अडथळा? महाराष्ट्रात प्रशिक्षण व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.