पोलिस ठाण्यात कॉट ट्रीटमेंट ?
नारायणगाव : दारू प्यायला पैसे दे असा तगादा लावून तसेच किरकोळ वादातून पतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून व डोक्यात लोखंडी रॉडने पत्नीने घाव घातला. यामध्ये देवराम सोमा डुकरे यांचा मृत्यू झाल्याची घटना जुन्नर तालुक्यातील थापमाळ, औरंगपूर येथे घडली. ही घटना सोमवारी (दि.९) रात्री साडेआठच्या सुमारास घडली.
हेदेखील वाचा : ‘त्या’ चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचा अखेर मृत्यू; काहीही कारण नसतानाही झाला हल्ला
देवराम सोमा डुकरे (वय ५४, रा. औरंगपूर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आरोपी दीपाली देवराम डुकरे (वय ४८) या महिलेला अटक करण्यात आली आहे. सध्या तिला ताब्यात घेतले असून, तिची कसून चौकशी केली जात आहे. त्यामध्येच तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे. तिच्यावर नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती कळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस उपनिरीक्षक जयदेव आप्पा पाटील यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. आरोपी दीपाली डुकरे हिला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असताना तिने हत्या केल्याची कबुली दिली.
देवरामला होते दारूचे व्यसन
मयत देवराम डुकरे या दारूचे व्यसन होते. तो नेहमी दारू पिऊन त्याच्या पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे दीपाली हिने सांगितले. सोमवारी देखील दारू प्यायला पैसे दे असा तगादा लावून पत्नीला मारहाण करू लागला. दररोजच्या होणाऱ्या मारहाणीला त्रासलेल्या दीपालीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला.
डोक्यात वार होताच जागेवरच कोसळला
रोडचा घाव वर्मी बसल्याने व जोराचा रक्तस्त्राव सुरू झाल्याने देवराम जागेवरच कोसळला. पती उठत का नाही म्हणून त्याला हलवून उठण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो उठत नसल्याने दीपालीने गावातील नातेवाईकांना फोन करून कळवले. नंतर घडला प्रकार समोर आला.
हेदेखील वाचा : सुप्रीम कोर्टाने दिलेला अल्टिमेटम संपला, तरीही आरजी कार हॉस्पिटलचे डॉक्टर संपावर ठाम, आता पुढे काय?