Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे पाहणी दौरे ही नाटकं बंद करून सरकारने तातडीने हेक्टरी १ लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्याच्या आधी जमा करावेत, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 10, 2026 | 06:05 PM
पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या; हर्षवर्धन सपकाळांची मागणी

Follow Us
Follow Us:
  • पाहणी दौरे, पंचनाम्यांची नाटकं बंद करा
  • दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख द्या
  • हर्षवर्धन सपकाळांची मागणी
जळगाव : राज्यातील बहुतांश भागात दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणाच जाणवत असून शेतकरी हवालदिल झाला आहे. सरकारने पाहणी दौरे केले, दुष्काळ जाहीर केला पण मदतीचा अजून थांगपत्ता नाही. सर्वे, पंचनामे, केंद्रीय पथकाचे पाहणी दौरे ही नाटकं बंद करून सरकारने तातडीने हेक्टरी १ लाख थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दसऱ्याच्या आधी जमा करावेत, सरसकट कर्जमाफी करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जळगाव व धुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला.

 

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले की, यावर्षीचा दुष्काळ प्रचंड मोठा आहे. राज्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडल्याने मोठे संकट उभे ठाकले आहे. या संकटावेळी सरकारने भरीव मदत केली पाहिजे. शेतकऱ्यांबरोबर शेतमजुरांना आर्थिक सहाय्य व वर्षाला १२ सिलेंडर मोफत द्यावी, जनावरांच्या छावण्या तत्काळ सुरु करा, चारा पाण्याची सोय करा. कर्जवसुलीचा तगादा लावू नये, पण सरकारने फक्त घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी होत नाही, मदत अजून पोहचलेली नाही. सावकारांकडून कर्जवसुलीचा तगादा लावला जात आहे. सरकारचे कोणी ऐकत नाही असे दिसते. सरकारकडे कुंभमेळ्यासाठी ३६ हजार कोटी रुपये आहेत, गरज नसताना हाती घेतलेल्या शक्तीपीठ महामार्गासाठी ८० हजार कोटी रुपये आहेत पण शेतकऱ्यांसाठी मात्र नाहीत. या दोन्ही प्रकल्पातील निधी शेतकऱ्यांसाठी वापरा. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठा आहे, त्याकडेही सरकारने लक्ष दिले पाहिजे. जलजीवन योजना भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे, असेही सपकाळ म्हणाले.

दिल्लीतील आंदोलन दडपण्यासाठी हुकूमशाही पद्धत

निवडणूक आयोगातील भ्रष्ट कारभाराविरोधात अख्खा देश एकवटला आहे, दररोज आंदोलने होत आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त यांना पदावरून हटवण्याची मागणी केली जात आहे. दिल्लीतही शांततापूर्ण आंदोलने केली जात असताना आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी दिल्लीत पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आंदोलकांची धरपकड करण्यात आली. रेल्वे बंद केल्या, दिल्ली मेट्रो बंद करण्यात आली. ही अराजकता नाही तर काय आहे. सरकार विरोधी आवाज पोलिस बळाच्या माध्यमातून बंद करणे हा हुकूमशाही कारभार आहे. मतचोरी उघड झाली असून मोदी सरकार घाबरले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांचा बचाव करण्यासाठी भाजपा मैदानात उतरली आहे. भाजपा निवडणूक आयोगाचा वकील आहे का, असा प्रश्नही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी विचारला आहे.

हे सुद्धा वाचा : ‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

MPSC चे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या योग्य आहेत. आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घेतला पाहिजे, ७० हजार पदांची भरती झाली पाहिजे व एमपीएससी मधील भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे या मागण्या सरकारने मान्य कराव्यात. पण सरकार मात्र विद्यार्थ्यांवर दडपशाही करत आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करत आहे. अशा कारवाया करून सरकार विद्यार्थ्यांचा आवाज बंद करू शकत नाही, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Web Title: Congress leader harshvardhan sapkal has demanded that the government provide assistance to farmers nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 06:05 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही
1

‘इनर रिंग रोड’च्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांची संमती; पीएमआरडीएकडून योग्य मोबदल्याची ग्वाही

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
2

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही
3

Bhandara News: अन् ‘त्या’ शेतकऱ्याने आपला शब्द खरा केला- मृत्यूला कवटाळले! पालकमंत्र्यांसमोर व्यथा मांडूनही दिलासा नाही

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश
4

सामाजिक जाणिव आणि माणुसकीचा स्पर्श असलेले संवेदनशील व्यक्तिमत्त्व हरपले; नाना पाटेकर यांच्या निधनावर सपकाळांचा शोकसंदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.