भरधाव चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक; महिला पोलीसाचा जागीच मृत्यू
विटा : राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अपघाताच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता बलवडी (ता. खानापूर) येथील सांगली- सातारा जुन्या रस्त्यावरील बलवडी फाट्यानजीक चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील प्रितंका अनंत पोटे (वय ३२, देवराष्ट्रे, ता. कडेगाव) या महिला पोलिसाचा जागीच मृत्यू झाला आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास बलवडी फाट्यावर हा अपघात झाला. याबाबत पोलीस महिलेचा दीर सागर सर्जेराव लोंढे यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रितंका पोटे या तुरची येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात मैदानी खेळाच्या प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या. मंगळवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास देवराष्ट्रे येथून त्या तुरची येथे पोलीस प्रशिक्षण केंद्राकडे दुचाकीवरुन (एमएच १० डीएच ९९०६) निघाल्या होत्या. बलवडी फाटा येथे आल्यानंतर चारचाकीची दुचाकीला धडक होऊन अपघात झाला. सकाळी पावणेसहाच्या सुमारास प्रितंका यांचे पती संतोष यांना त्यांचे मित्र अक्षय शिंदे यांनी फोनवरून प्रितंका यांचा बलवडी फाट्यावर अपघात झाल्याचे कळविले. त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने बलवडी फाट्याकडे धाव घेतली.
दरम्यान प्रितंकांच्या डोक्याला मार लागल्याने त्या जागीच ठार झाल्या. तर पोटे यांच्या दुचाकीसह चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले. विटा पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. प्रितंका पोटे यांचा मृतदेह पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. चारचाकी चालक उदय रामचंद्र पवार (वय ३६, रेठरे हरणाक्ष, ता. वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! ग्राहकाचा भाजी विक्रेत्यावर चाकूने हल्ला; सपासप वार केले अन्…
दीर- भावजयचा मृत्यू
गेल्या काही दिवसाखाली पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हे सुद्धा वाचा : मुलाच्या प्रेमाची शिक्षा बापाला; मुलीच्या भावाच्या भयानक कृत्याने पुणे हादरलं!