संग्रहित फोटो
पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता भाजी खरेदी करताना झालेल्या वादातून ग्राहकाने भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत घडली आहे. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्या ग्राहकाचे नाव आहे. या हल्ल्यात भाजी विक्रेते शौकत बाबामियाँ (वय ३६) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शौकत यांचा खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. मनोज मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भाजी खरेदीसाठी आला. भाजी खरेदी करताना मनोजने त्यांच्याशी वाद घातला. बाचाबाचीतून त्याने चाकूने शौकत यांचा गळा आणि चेहऱ्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या शौकत यांना मंडईतील भाजी विक्रेत्यंनी रुग्णालयात दाखल केले. मनोज पसार झाला असून, अधिक तपास सहायक निरीक्षक अर्जुन बेंदगुडे करत आहेत.
हें सुद्धा वाचा : मुलाच्या प्रेमाची शिक्षा बापाला; मुलीच्या भावाच्या भयानक कृत्याने पुणे हादरलं!
जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला
गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.
कोथरूडमध्ये भरदिवसा तरूणाचा खून
पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता कोथरूड भागातील शास्त्रीनगर येथे सागर कॉलनी परिसरात तरूणाचा चार अल्पवयीन मुलांनी पालघन सारख्या धारदार हत्यारांनी डोक्यात तसेच मानेवर व हातावर वार करून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घटना घडल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. आशिष दशरत जाधव (वय ३५) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी चार अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.