crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मुंबई: मुंबईतुन एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणीने प्रथितयश वकिलाला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे. त्याचे मॉर्फ केलेले काही फोटो दाखवून या वकिलाला धमकावण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिने वकिलासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचे देखील प्रयत्न केले. वकिलाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तरुणी आणि तिच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल केला आहे.
नेमके प्रकरण काय?
प्राथमिक माहितीनुसार, पीडित वकील आणि आरोपी तरुणीची ओळख मित्रांमार्फत झाली होती. गेल्यावर्षी ही तरुणी वकिलाच्या मित्रांसोबत त्याच्या घरी देखील गेली होती. त्यानंतर हे दोघे इन्स्टाग्रामवरुन एकमेकांशी चॅटिंग करू लागले. काही काळानंतर दोघांनी एकमेकांचे मोबाईल नंबर घेऊन बोलायला सुरुवात केली. नंतर दोघेही अधूनमधून भेटायला लागले होते. दोघांमधील मैत्री घट्ट झाल्यानंतर या तरुणीने वेगवेगळी कारणे सांगून वकिलांकडून पैसे मागायला सुरुवात केली. बरच्याचवेळा त्याने तिला पैसे दिले. ही रक्कम जवळपास २० ते 30 लाखांच्या घरात होती. त्यानंतर वकिलाने पैसे परत मागितले तेव्हा तरुणीने नकार दिला. एवढेच नाही तर दोघांच्या भेटीवेळचे खासगी फोटो मॉर्फ करुन ते व्हायरल करण्याची आणि बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी सुद्धा दिली.
घरात एकटा असतांना…
आरोपी तरुणीने पीडित वकिलाच्या घरी येऊन त्याच्याशी शरीरसंबंध ठेवण्याचाही प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. तेव्हा वकिलाने, मी विवाहित आहे, मला लहान मुलगी आहे, असेही या तरुणाला सांगितले. तरीही ही तरुणी वकिलाशी शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न करत राहिली. तसेच तू माझ्यासोबत फिरायला चल, असा हट्टही या तरुणीने धरला होता. त्यानंतर तरुणीने या वकिलाला ब्लॅकमेल करुन जवळपास दीड कोटी रुपये उकळले. गोरेगाव पोलीस ठाण्यात या तरुणीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
भारताचे प्रतिनिधित्व
पीडित वकील हा केंद्र सरकारसाठी अत्यंत उच्च पदावर काम करतो. त्याने जी-20 परिषदेसह (G 20 summit) आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने मुंबई पोलिसांनी तातडीने हालचाली करत वकिलाला ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणीवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आणखी काय कारवाई होणार, याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर