Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli Crime: किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

सांगलीत किरकोळ वादातून झालेल्या चापटीचा राग मनात धरून 18 वर्षीय चेतन तांदळे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या प्रकरणी सुजल वाघमोडेसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 11, 2026 | 12:59 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • किरकोळ वाद, चापट मारल्याचा राग
  • धारधार शस्त्राने केली हत्या
  • एक आरोपी ताब्यात, तपास सुरू
सांगली: सांगली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग अनावर झाल्याने एकाने १८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव चेतन अप्पासाहेब तांतळे असे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे. ही घटना शामरावनगर परिसरात घडली आहे.

Nitesh Rane News: नितेश राणेंच्या घराबाहेर बेवारस बॅग अन् एक चिठ्ठी….; घातपाताचा प्रयत्न की आणखी काही

काय नेमकं प्रकरण?

रामनगरला राहणार चेतन आप्पासाहेब तांदळे (१८ वर्षीय) रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. शुक्रवारी रात्री चेतन आणि मित्र हर्षवर्धन गायकवाड हे दोघेजण वरद कॉलनी शामरावनगर येथे दाबेली खाण्यासाठी थांबले होते. तेव्हा सुजल आणि विनोद डांगे तिथे दुचाकीवरून आले. सुजल हा सतत जॅकेटमध्ये हात घालत होता. त्यामुळे चेतन याने त्याच्याजवळ जाऊन जॅकेट चाचपले. तेव्हा कमरेला चाकू असल्याचे आढळले. ‘चाकू घेऊन का फिरतोस?’ म्हणून चेतन याने त्याच्या कानाखाली चापट मारली. तेव्हा सुजल व विनोद तेथून निघून गेले.

चेतन व हर्षवर्धन दुचाकीवरून जात असताना सुजलचा भाऊ शुभम याने त्याला थांबवले. तू सुजलला का मारलेस म्हणून जाब विचारला. दोघांमध्ये वाद सुरू असताना सुजल, मामा विनोद, राहुल जाधव तेथे आले. त्यांनी चेतनवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. गर्दी जमल्यानंतर चौघेजण दुचाकीवरून पळाले, चेतनच्या गळ्यात घुसलेला चाकू तसाच होता. डोक्यात, पोटावर, गळ्यात खोलवर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवला आहे. सुजल उर्फ पाप्या वाघमोडे, भाऊ शुभम वाघमोडे, राहुल जाधव, सुजलचा मामा विनोद डांगे यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विनोद डांगे याला ताब्यात घेण्यात आले असून पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या कशामुळे झाली?

    Ans: किरकोळ वादात चापट मारल्याचा राग अनावर झाल्याने हत्या करण्यात आली.

  • Que: आरोपी किती जण आहेत?

    Ans: एकूण चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल आहे.

  • Que: हत्या कशी करण्यात आली?

    Ans: चाकूने गळा, डोके व पोटावर वार करून निर्घृण हत्या केली.

Web Title: Sangli crime an 18 year old man brutally murdered with a sharp weapon in sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 12:59 PM

Topics:  

  • crime
  • Crime in Sangli
  • Sangli
  • Sangli Crime

संबंधित बातम्या

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल
1

Solapur Crime: बापाने रागाच्या भरात सात वर्षांच्या जुळ्या चिमुरड्यांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःही उचलला टोकाचा पाऊल

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?
2

Delhi Crime: दिल्लीतील 17 वर्षीय तरुणाची बेदम मारहाण करून निर्घृण हत्या; सर्व आरोपी अल्पवयीन; कारण काय?

Chattisgarh Crime: रक्षकच भक्षक! पोलीस हेल्पलाईन चालकासह 5 जणांकडून 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार
3

Chattisgarh Crime: रक्षकच भक्षक! पोलीस हेल्पलाईन चालकासह 5 जणांकडून 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न
4

Solapur: एसटीचा पास नाही म्हणून कंडक्टरने पाचवीतील चिमुकल्याला थेट हायवेवर उतरवलं; विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.