नाशिक येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. माझं अस्तित्व अनेकांसाठी त्रासदायक ठरत आहे… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ… असे हृदयद्रावक पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आले आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
हि घटना शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास गंगापूर रोडवर घडली आहे. इथे एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याने चौथ्या मजल्यावरून उडी घेत विद्यार्थ्याने आत्महतयेचा प्रयत्न केला आहे. त्याला गंभीर अवस्थेत तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान शनिवारी मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.
सोशल मीडिया पोस्ट मध्ये काय?
“हाय गाइज… तुम्ही मला शेवटचं ऐकत आहात. आयुष्यातील माझा इंटरेस्ट संपला आहे. माझ्या आयुष्यात आता कोणतंही ध्येय किंवा स्वप्न शिल्लक नाही. माझ्यामुळे अनेकांना त्रास झाला आहे. तीन वर्षांपूर्वीच मी मरणार होतो, पण माझ्या गर्लफ्रेंडमुळे आणखी तीन वर्ष जगलो. शाळेपासूनच मी नैराश्य आणि मानसिक त्रासात होतो. आता मात्र तो टोकाला पोहोचला आहे.
माझ्या कुटुंबीय, मित्र आणि हितचिंतकांचे मनापासून आभार. तुम्ही काहीच चुकीचं केलं नाही, मीच पात्र नव्हतो. तुमचे सर्व प्रयत्न मी वाया घातल्याबद्दल क्षमस्व. सॉरी… साइनिंग ऑफ फ्रॉम लाइफ. गुड बाय…” असे विद्यार्थ्याने शेवटच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पोस्ट नांतर मित्रांनी समाजवल…
या पोस्टनंतर काही मित्रांनी त्याला समजावत, “अरे, अभ्यास कर. वेडेपणा करू नको” अशा स्वरूपाच्या कमेंट्स केल्याचंही उघड झालं आहे. मात्र तोवर वेळ निघून गेली होती.
दहावीमध्ये 95 टक्क्यांहून अधिक गुण
मृतक हा पाथर्डी फाटा परिसरात आपल्या पालकांसोबत राहत होता. त्याचे वडील एका खासगी कंपनीत काम करत असून तो त्यांच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. त्याला दहावीमध्ये 95 टक्क्यांहून अधिक गुण मिळवले होते. काही काही आठवड्यांपूर्वीच त्याने गुणवत्ता यादीतून प्रवेश मिळवत अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्यांनतर काही काळाने त्याने भावनिक पोस्ट करत टोकाचे पाऊल उचलले.
तपास सुरु
गंगापूर पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सोशल मीडियावर लिहिलेली पोस्ट तपासासाठी महत्त्वाची ठरत असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे त्याने पोस्टमध्ये व्यक्त केलेली भावना आणि उल्लेखांमधून त्याच्या मानसिक अवस्थेचा अंदाज घेत गंगापूर पोलीस अधिक तपास करत आहे. विध्यार्थ्यांच्या या टोकाच्या निर्णयाने परिसरात शोककळा पसरली आहे.
सायबर चोरांचा डिजिटल हल्ला ! नऊ महिन्यांत अब्जावधींची लूट; धक्कादायक आकडेवारी समोर