Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! प्रेमसंबंधातून तरुणीवर वेळोवेळी अत्याचार; गर्भवती होताच गर्भपातही केला अन् नंतर…

अनिल ईजगामकर याने पीडित मुलीशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध जुळवून लग्न करतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 04, 2024 | 01:36 PM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Follow Us:

गडचिरोली : एका मुलीवर अत्याचार करण्याता आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीवर अत्याचार करून गर्भपात करणाऱ्या दोन आरोपींना अहेरी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. एन. बावणकर यांनी मंगळवारी (दि. 3) पहिल्या आरोपीस सात वर्षे व दुसऱ्या आरोपीस 4 वर्षे सश्रम कारावास व दोन्ही आरोपींना 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हेदेखील वाचा : मुंबईत चाललंय तरी काय? एक वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार, परळमधील धक्कादायक प्रकार

अनिल नानाजी ईजगामकर (34, रा. आलापल्ली), चंद्रकला सुरेश धानोरकर (47, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. अनिल ईजगामकर याने पीडित मुलीशी तीन वर्षापासून प्रेमसंबंध जुळवून लग्न करतो, असे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे पीडिता गर्भवती राहिली. तिचा गर्भपात करण्याकरिता आरोपीची मावशी चंद्रकला धानोरकर हिच्या मदतीने पीडितेला औषध पाजून गर्भपात केला. त्यामुळे पीडितेला रक्तस्राव होऊन ती गंभीर आजारी पडली. पीडिता ही अल्पवयीन व अनुसूचित जाती जमातीची असल्याचे आरोपीस माहिती असतानाही त्याने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

याबाबतच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. तपासादरम्यान याप्रकरणातील पीडिता ही उपचारादरम्यान मृत पावली. त्यामुळे कलमात वाढ करण्यात आली. तपासात आरोपी विरुद्ध मृत्युपूर्व जबानी (बयाण) दिल्यामुळे तसेच सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.

अतिरिक्त सत्र न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदार तसेच वैद्यकीय अभिप्राय यांचे पुरावा व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश बावणकर यांनी मंगळवारी आरोपी ईजगामकर याला 7 वर्षे सश्रम कारावास व 5 हजार रुपये दंड तसेच चंद्रकला धानोरकर हिला 4 वर्ष कारावास व 5 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

अत्याचारांच्या घटनांमध्ये होतीये वाढ

राज्यात सर्वाधिक अत्याचाराचे गुन्हे मुंबईत दाखल असून, दुसऱ्या क्रमाकांवर ठाण्याचा क्रमांक लागतो. गेल्या चार महिन्यांत मुंबईत 226 अत्याचाराचे गुन्हे दाखल असूनस, ठाण्यात 118 तर पुण्यात 112 अत्याचाराच्या घटनांची नोंद झाली आहे. ही धक्कादायक माहिती महाराष्ट्र पोलिसांच्या संकेतस्थळावरुन समोर आली आहे.

पोलिस निरीक्षकाकडून धमकी देऊन घाणेरडे कृत्य

दुसऱ्या एका घटनेत, पोलिस निरीक्षकाकडून विवाहित तरुणीला तुरुंगात पाठवण्याची धमकी देऊन घाणेरडे कृत्य केल्याचा आरोप आहे. त्याच्या मुलीच्या वयाच्या एका मुलीला घरी बोलावले, त्यानंतर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिस निरीक्षकाने पीडितेसोबत घाणेरडे कृत्य करू लागला. पीडित महिला त्याला वारंवार नकार देत होती, पण इन्स्पेक्टर तिच्या नकाराला फेटाळून लावत होता. तो तिच्यावर जबरदस्ती करत राहिला. दरम्यान, संधीचा फायदा घेत पीडित मुलीने गुपचूप तिच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवला आणि इन्स्पेक्टरची घाणेरडी कृती कॅमेऱ्यात कैद झाल्याचाही प्रकार समोर आला आहे.

हेदेखील वाचा : विमानतळावर सामानात सापडला नवजात अर्भकाचा मृतदेह, प्लास्टिकच्या डब्यात केमिकल टाकून केलं पॅक; Video Viral

Web Title: A young woman was repeatedly abused during a love affair nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 01:36 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.