
धक्कादायक ! पोटच्या मुलाकडून बापाची हत्या; घरातच पुरला होता मृतदेह, दुर्गंधी सुटली अन्...
छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. किरकोळ कारणावरून खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असताना आता पैठण तालुक्यातील कडेठाण येथे खूनप्रकरण समोर आले आहे. यामध्ये पोटच्या मुलाने बापाची हत्या केली. इतकेच नाहीतर तब्बल दहा दिवस त्याचा घरातच मृतदेह पुरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
दहा दिवसांपूर्वी पोटाच्या लेकाने आपल्या बापाची निर्घृणपणे हत्या करून राहत्या घरात मृतदेह पुरला होता. नंतर घरातून दुर्गंधी येत असल्याने शनिवारी दुपारी या घटनेला वाचा फुटली. महसूल कर्मचारी, फॉरेन्सिक पथक यांच्या उपस्थितीत घरात पुरलेला केलेला मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढून घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. कल्याण बापुराव काळे (वय ६०) असे हत्या झालेल्याचे नाव आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली.
पैठण तालुक्यातील कडेठाण येथील कल्याण बापुराव काळे यांना दोन मुले आहेत व एक मुलगी आहे. मोठा मुलगा ऊसतोडी कामाला जातो. घरी कल्याण काळे, सुमन काळे व मुलगा राम काळे हे तिघे राहत होते. मागील दहा दिवसांपूर्वी कल्याण काळे व राम काळे या बापलेकात वादातून कल्याण काळे यांचा मृत्यू झाला. मात्र, या घटनेचा कानोसा कोणालाही न लागावा म्हणून राम काळे याने आपल्या बापाला राहत्या घरात गड्डा खोदून दफन केले. कल्याण काळे यांची पत्नी सुमन काळे ही भोळसर असल्याने तिने या घटनेची माहिती कोणालाही दिली नाही.
15 वर्षांपूर्वी स्वतःच्या लेकीवर अत्याचार
या घटनेविषयी आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेतील कल्याण बापुराव काळे याने १५ वर्षापूर्वी आपल्या लेकीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली. त्या संबंधित कल्याण काळे याला शिक्षाही झाली होती. जेलची हवा खाऊन तो परतला होता.
किरकोळ कारणावरून बेदम मारहाण नंतर मृत्यू
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राम काळे (वय २८) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता किरकोळ कारणातून वाद निर्माण झाला व लाथाबुक्याच्या मारहाणीत कल्याण काळे यांचा मृत्यू झाल्याची कबुली दिली आहे. या घटनेसंदर्भात पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेदेखील वाचा : धक्कादायक ! उपचारासाठी गेलेल्या मुलालाच डॉक्टरची मारहाण; पालकांना बाहेर जायला सांगितलं, CCTV पाहताच…