एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
अमरावती : महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर आठ वर्षे लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर आरोपी तरुणाने दुसऱ्या मुलीशी लग्न केले. या घटनेची तक्रार महिलेने शुक्रवारी (दि. 30) नांदगावपेठ पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी महेश लालूप्रसाद (38, रा. राहुल नगर, विद्यापीठ रोड, राजुरा, अमरावती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : माजी गृहराज्यमंत्र्याच्या मुलाच्या हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; राजकीय वर्तुळात खळबळ
नांदगावपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेची आठ वर्षांपूर्वी आरोपी महेशसोबत ओळख झाली होती. दरम्यान, 1 नोव्हेंबर 2017 रोजी महेशने तिला प्रेमाची विनवणी केली. त्यानंतर महिलेने आपल्या जीवनातील सर्व व्यथा महेशला सांगितली. त्यावेळी त्याने ‘मी तुझ्याशी लग्न करेल’ असे म्हटले आणि तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर त्याने महिलेला सातत्याने आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
दरम्यान, महेशचे लग्न दुसऱ्या मुलीसोबत होत असल्याची माहिती, महिलेला त्याच्या मित्राकडून मिळाली. त्याने महिलेला लग्नाची पत्रिकाही दाखवली. त्यावेळी जाब विचारण्यासाठी महिलेने महेशला फोन केला असता, ‘माझा तुझ्याशी संबंध नाही, मला तुझ्याशी संबंध ठेवायचे नाहीत’, असे तो म्हणाला. त्यामुळे महेशने आपली फसवणूक केल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने नांदगावपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ
राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हेदेखील वाचा : लिव्ह-ईन रिलेशनच्या कारणातून तरुणाला बेदम मारहाण; जबड्याचे हाड फ्रॉक्चर