Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भोसरीतील अन्न वितरण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; 16 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

अन्नधान्य वितरण विभागाच्या ‘फ’ झोनचे भोसरी येथील परिमंडळ अधिकारी गजानन अशोकराव देशमुख याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 12, 2025 | 11:21 PM
भोसरीतील अन्न वितरण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; 16 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

भोसरीतील अन्न वितरण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; 16 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन रेशनकार्ड मंजुरीसाठी लाचेची मागणी
  • भोसरीतील अन्न वितरण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
  • 16 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
पिंपरी : अन्नधान्य वितरण विभागाच्या ‘फ’ झोनचे भोसरी येथील परिमंडळ अधिकारी गजानन अशोकराव देशमुख (वय ३६, रा. धनकवडी, पुणे) याला १६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. भोसरी येथे अन्न वितरण कार्यालयात गुरुवारी (दि. ११ डिसेंबर) दुपारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. १४ नागरिकांच्या नवीन रेशनकार्ड मंजुरीसाठी त्याने लाचेची मागणी केली होती.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, सामाजिक कार्य करत असलेल्या २५ वर्षीय तरुणाने याबाबत बुधवारी (दि. १० डिसेंबर) एसीबीकडे तक्रार केली. तक्रारदार हे अपंग असून, समाजकार्यात सक्रिय आहेत. त्यांच्या ओळखीतील १४ जणांची नवीन रेशनकार्ड काढण्याची प्रक्रिया पूर्ण करून ‘एन’ नंबर प्राप्त झाल्यानंतर तक्रारदार हे अन्न नागरी पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक गजानन देशमुख याला भेटले. तेव्हा त्याने प्रत्येक रेशनकार्डसाठी ९०० रुपयांप्रमाणे १२ हजार ६०० रुपये लाचेची मागणी केली. ही रक्कम शासकीय फी व्यतिरिक्त असल्याने तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवली.

एसीबीने केलेल्या पडताळणीदरम्यान देशमुख याने १४ रेशनकार्ड मंजूर करून त्यावर सही शिक्का देण्यासाठी सुरुवातीला १९ हजार रुपयांची मागणी करून तडजोडीनंतर १६ हजार रुपयांवर व्यवहार निश्चित केल्याचे निष्पन्न केले. त्यानुसार गुरुवारी दुपारी भोसरी येथील अन्नधान्य वितरण कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १६ हजार रुपये लाच स्वीकारताना गजानन देशमुख याला रंगेहात पकडण्यात आले. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ च्या कलम ७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Acb catches food distribution officer in bhosari taking bribe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 11:32 AM

Topics:  

  • Bribe News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…
1

खळबळजनक! थेट कोल्हापूरचे कलेक्टर ऑफिसच Bomb ने उडवण्याची धमकी; ईमेल येताच…

मोठी बातमी! चिपळूणच्या उद्योजकाचा दहशतवाद्यांशी संबंध? ED चे पथक 24 तास ठाण मांडून, चौकशी होणार
2

मोठी बातमी! चिपळूणच्या उद्योजकाचा दहशतवाद्यांशी संबंध? ED चे पथक 24 तास ठाण मांडून, चौकशी होणार

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष
3

आमदार तापकिरांनी मांडला मतदारसंघासाठीच्या विकासाचा रोड मॅप; अधिवेशनामध्ये चर्चेदरम्यान शासनाचे वेधले लक्ष

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले
4

आळंदीच्या इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, परिसरात खळबळ; नागरिक संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.