लाचखोर वनपाल एसीबीच्या जाळ्यात
पुणे : राज्यात लाच घेतल्याच्या अनेक घटना उघडकीस येत असतात. शासकीय नोकरदार तसेच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पकडत असताना एका सहायक पोलीस निरीक्षकांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच देणाऱ्या इस्टेट एजंटवर कारवाई केली आहे. बहुतांश वर्षांनी असे प्रकरण पाहिला मिळाले. एसीबीने गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. हसनअली गुलाब बारटक्के ( ४५, सरस्वती कृपा सोसायटी, ताडीवाला रोड, पुणे) याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार कदम यांनी तक्रार दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
लाच मागणाऱ्या बारटक्के याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचा तपास अधिकारी सहायक निरीक्षक नंदकुमार कदम यांच्याकडे होता. त्या गुन्ह्यात कदम यांनी आपल्याला मदत करावी अशी आरोपी बारटक्के याची इच्छा होती. त्यासाठी बारटक्के कदम यांना वारंवार लाच देण्याचा प्रयत्न करत होता. मात्र लाच घेणे मान्य नसल्याने कदम यांनी एसीबीला याबाबत माहिती दिल्यानंतर सापळा रचत बारटक्के याला दोन हजाराची लाच देताना रंगेहात पकडले.
हे सुद्धा वाचा : महाराष्ट्र पोलीस अॅक्शन मोडमध्ये; थेऊरमध्ये राहणाऱ्या बांगलादेशीवर केली कारवाई
पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात
दरम्यान गेल्या काही दिवसाखाली सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आली आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले.
एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.