crime (फोटो सौजन्य- social media)
कुर्ला रेल्वे स्थानकावर फारशी बसवण्याचा काम सुरु होता. त्यावेळी तिथे ना बॅरिकेटिंग होतं, ना कोणतीही सूचना फलक. या निष्काळजी पणामुळे एक महिला खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. या निष्काळजीपणामुळे गंभीर जखमी झालेल्या महिलेने ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल व्हावा यासाठी गेल्या १५ तासांपसायन पोलीस ठाण्याच्या बाहेर बसून आपली न्यायाची मागणी लावून धरली आहे. गंभीर जखमी झालेल्या महिलेचं नाव इंदू पगारे (वय 52),असे आहे. त्या कल्याणमधील आंबिवली परिसारात राहतात व कुर्ला येथे केअरटेकर म्हणून काम करतात.
पाच लाखांसाठी विवाहितेला दिलं पेटवून; कोर्टाने पतीसह सासरच्या मंडळींना ठोठावली ‘ही’ शिक्षा
नेमकं काय घडलं?
२६ जून रोजी पगारे या कुर्ला रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरल्या असतांना, तिथे फारशी बसवण्याच्या काम सुरु होता. त्याठिकाणी त्यावेळी सुरक्षेची कोणतीही व्यवस्था नव्हती. कामाच्या ठिकाणी ना बॅरिकेटिंग होतं, ना कोणतीही सूचना फलक. या निष्काळजीपणामुळे पगारे या खुल्या खड्ड्यात पडल्या आणि त्यांच्या डाव्या हाताला गंभीर दुखापत झाली. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी तत्काळ भाभा रुग्णालयात नेऊन प्रथमोपचार दिल्यानंतर, त्यांना के. एम. रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या हातावर शस्त्रक्रिया करून रॉड बसवण्यात आला. त्यांना जेव्हा बरं वाटलं तेव्हा इंदू पगारे यांनी थेट कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात येत नाही आहे आणि त्यांना अपमानास्पद वागणूक देत तक्रार नोंदवण्यास नकार दिल्याचा आरोप महिलेने केला आहे.
पगारे दाम्पत्याचे म्हणणे काय?
पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना म्हंटले आहे की “तुम्हाला कुठे जायचं तिकडे जा, आम्ही काही करत नाही,” असे उत्तर त्यांना देण्यात आले. तर पगारे दामोदात्यांचे म्हणणे आहे की “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आम्ही पोलीस ठाणं सोडणार नाही.” संध्याकाळी पाच वाजल्यापासून कुर्ला लोहमार्ग पोलीस स्टेशनबाहेर न्यायासाठी वयोवृद्ध दाम्पत्य ठिय्या मांडून बसले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलीस नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मुंबई हादरली! दुबईत मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष देत महिलेवर केले वारंवार अत्याचार
दरम्यान, नवी मुंबई येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष देत पीडित महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ५५ वर्षीय सिराज इद्रीस चौधरी याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेला दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे अमिश देत तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी इद्रिस चौधरी याच्यावर या आधी देखील गुना दाखल करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
धक्कादायक! १० वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह कॅनॉलमध्ये सापडला; खून का नरबळी?