मृत कार्तिक बळीराम खंडाळे(फोटो-सोशल मीडिया)
टेंभुर्णी : अरण ता माढा येथून मंगळवारी १५ रोजी गावच्या यात्रेमध्ये गेल्यानतर बेपत्ता झालेला कार्तिक बळीराम खंडाळे वय १० वर्षीय शाळकरी मुलाचा मृतदेह अरण पासून जवळच असलेल्या अरण करकंब रोड लगत जाधववाडी हद्दीतील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या कोरड्या कॅनॉल मध्ये शनिवारी सकाळी सकाळी अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.याठिकाणी नातेवाईकांनी आक्रोश केला असून त्याला कोणत्या कारणासाठी जीव मारले कि त्याचा नरबळी झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात असून या प्रकरणाने माढा तालुक्यात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अरण ता.माढा येथून यात्रेत जातो म्हणून इयत्ता चौथी मध्ये शिकत असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे याचे अपहरण झाल्याची तक्रार दिली होती.मागील पाच दिवसांपासून त्याचा शोध घेण्याचे काम चालू असताना त्याचा मृतदेह अर्धवट अवस्थेत कुजलेल्या स्थितीत
आढळून आलेल्या ठिकाणावर ठिकाणी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी एकच गर्दी केली होती.
टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पोलिस पथकासह आहेत.तर पुढील तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीम आली असून तपास कार्य सुरू आहे.याठिकाणी अरण व परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.त्याचे अपहरण झाले दिवसापासून त्याचा खून करण्यात आला कि त्याचा बळी देण्यात आला.कि आषाढ महिना चालू असल्याने अघोरी कृत्य करणा-यांनी नरबळी दिल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात आहे.याचा खून झाला कि नरबळी दिला याचा शोध लावण्याचे टेंभुर्णी पोलीसांसमोर मोठे अहवान आहे.
हे प्रकरण गंभीर असून याचा खून झाला कि बळी दिला याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक पथक, श्वानपथक,एलसीबी चे जगताप पथकासह बार्शी चे पोलिस उप अधिक्षक जालीदर नालकुल कुर्डुवाडी चे पोलिस निरीक्षक चिल्लावार, टेंभुर्णी चे पोलिस निरीक्षक नारायण पवार,आरसीपी पथकासह जवळपास १०० पेक्षा अधिक कर्मचारी घटनास्थळी होते. मृत कार्तीकचा मृतदेह हा अर्धवट कुजलेल्या अवस्थेत आढळून आला असून त्याचे सर्व नमुने घेतल्यानंतर शवविच्छेदन करण्यासाठी सोलापूर येथील सरकारी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.
मयत बालक कार्तिक हा दलित कुटुंबातील असून घटना उघडकीस आलेल्या ठिकाणी रिपाईचे बापूसाहेब जगताप,मातंग एकता आंदोलन चे रामभाऊ वाघमारे, सोलापूर चे नगरसेवक बबलु गायकवाड,सुनिल ओव्होळ,दिपक बनसोडे,अनिल जगताप यांनी हजेरी लावून या प्रकरणाचा कसून तपास करून मुळ आरोपीचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हेही वाचा : Beed crime News :बीड मध्ये चाललंय तरी काय? तरुणाला दोन दिवस ठेवलं डांबून, अमानुष मारहाणीत तरुणाचा मृत्यू
अपहरण करून बळी दिल्याचा संशय
मोलमजुरी करून खाणारे खंडाळे कुटुंबाचे कोणाशीही वैर नाही.परंतु मागील पाच दिवसांपासून गायब असलेल्या कार्तिक बळीराम खंडाळे या १० वर्षीय बालकाचा आज शनिवारी मृतदेह आढळून आला असून त्याचे अपहरण करून त्याचा बळी दिला असल्याचा संशय आहे.पोलीसांनी त्याचा नरबळी झाला का कोणता बळी दिला याचा तपास करावा अन्यथा सर्व समाज आणि गावकरी आंदोलन करणार.
धनंजय मनोहर खंडाळे (नातेवाईक, अरण मयत कार्तीक खंडाळ)