Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: आरोपी महिलेच्या घराबाहेर आला, हात पकडला अन्…; पोलिसांकडून गुन्हा दाखल

महिलेने घडलेला प्रकार महिलेच्या पतीला सांगितल्याने महिलेचे पती व महिला सनी याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 04, 2025 | 02:35 AM
Crime News: आरोपी महिलेच्या घराबाहेर आला, हात पकडला अन्…; पोलिसांकडून गुन्हा दाखल
Follow Us
Follow Us:

शिक्रापूर: टाकळी भिमा ता. शिरूर येथील महिला घरामध्ये असताना गावातील सनी शिनगारे महिलेच्या घराबाहेर आला, त्याने महिलेचा हात पकडत महिलेच्या मनास लज्जा निर्माण होईल असे कृत्य केल्याने सनी हा पळून गेला.  त्यानंतर महिलेने घडलेला प्रकार महिलेच्या पतीला सांगितल्याने महिलेचे पती व महिला सनी याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले असता सनी व त्याचा भाऊ तसेच त्याच्या मामाच्या मुलाने महिलेसह महिलेच्या पतीला शिवीगाळ दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत पीडित महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी सनी शिनगारे, विनोद दिनकर शिनगारे, स्वप्निल सुनील ढिले सर्व रा.  टाकळी भीमा ता. शिरूर जि. पुणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग हे करत आहे.

दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त

राज्यात गांजा तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून गांजा विक्रीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता  शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन स्कॉर्पिओ जप्त करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले असून, शिक्रापूर पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीमध्ये पोलिसांनी 53 किलो गांजा तब्यात घेतला आहे. तसेचं वैष्णव वैजनाथ ढाकणे, स्वप्नील गोरक्षनाथ खेडकर, हर्षद देविदास खेडकर, शुभम बंडू जवरे, तुषार रामनाथ जवरे व अक्षय कांतीलाल आव्हाड या सहा जणांना अटक केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे- नगर महामार्गावरून दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओमधून काही युवक गांजा घेऊन जाणार असल्याची माहिती पोलीस हवालदार मिलिंद देवरे यांना मिळाली, त्यांनतर पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पुणे नगर रस्त्यावर सापळा लावला असता त्यांना दोन पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ आल्याचे दिसून आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही स्कॉर्पिओमध्ये तपासणी केली असता त्यामध्ये गांजा असल्याचे दिसून आले.

हेही वाचा: शिक्रापूर पोलिसांची मोठी कारवाई; दोन स्कॉर्पिओसह 53 किलो गांजा जप्त

गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना ठोकल्या बेड्या

दरम्यान गेल्या काही दिवसाखाली पुणे शहराच्या मध्यभागात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या दोन तरुणांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्या दोघांकडून ८२० ग्रॅम गांजा जप्त केला असून, युनिट एकच्या पथकाने ही कारवाई शुक्रवार पेठेत केली आहे. समाधान केदा पवार (वय ३३, रा. नाशिक), संदीप सखाराम खैरनार (वय ३८, रा. पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद, पोलीस अंमलदार सुजय रिसबुड व त्यांच्या पथकाने केली आहे.

84 लाखांचे अमली पदार्थ जप्त

पुणे शहरात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये तब्बल ८४ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले आहे. कोरेगाव पार्क आणि लोणी काळभोर परिसरात या कारवाया करण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमधील ही मोठी कारवाई मानली जात आहे.

Web Title: Accsued misbehave with woman at takli bhima shikrapur marathi crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2025 | 02:35 AM

Topics:  

  • crime
  • police
  • Shikrapur

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
2

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
3

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या
4

Ujjain Shahi Masjid: शाही मशिदीच्या कारवाईवरून उज्जैनमध्ये गोंधळ; जमाव-पोलिसांत संघर्ष, दगडफेकीनंतर अश्रुधुराच्या नळकांड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.