Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…; पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?

वाडेबोल्हाई मंदिराजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास अजित आणि गणेश यांच्यात पु्न्हा बाचाबाची झाली. त्या वेळी वाडेबोल्हाई मंदिराजवळून चौघे जण तेथे आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 14, 2025 | 08:38 PM
Pune Crime: आधी दांडक्याने बेदम मारहाण अन् नंतर पिस्तुलातून…;  पुण्याच्या ‘या’ भागात नेमके घडले तरी काय?
Follow Us
Follow Us:
पुणे:  नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात गुरुवारी रात्री पिस्तुलातून हवेत गोळीबार करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. गोळीबारापूर्वी आरोपींनी एकाला दांडक्याने बेदम मारहाण देखील केली. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणी गणेश संजय चैाधरी (वय २९), ओंकार अंकुश लांडगे (वय २५, दोघे रा. वाडेबोल्हाई) यांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अजित महादेव जाधव (वय २६, रा. जाधव वस्ती, बकोरी) याने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मारहाणीत जुनैद शेख जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गणेश चौधरी आणि अजित जाधव यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी अजितने गणेशच्या कानशिलात लगावली होती. तेव्हापासून गणेश हा अजितवर चिडून होता. वाद मिटविण्यासाठी गणेश आणि अजित मित्रांना घेऊन गुरुवारी (१३ मार्च) नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात आले. वाडेबोल्हाई मंदिराजवळ रात्री साडेबाराच्या सुमारास अजित आणि गणेश यांच्यात पु्न्हा बाचाबाची झाली. त्या वेळी वाडेबोल्हाई मंदिराजवळून चौघे जण तेथे आले. त्यांनी पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर दाेन्ही गटातील तरुण पळाले. जाधवचा मित्र जुनैद शेख दुचाकीवर थांबला होता. त्याला दांडके, तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली.

गोळीबाराची माहिती मिळताच लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, सहायक निरीक्षक रवींंद्र गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी गणेश आणि साथीदार ओंकार यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन पुंगळ्या जप्त केल्या आहेत, अशी माहिती सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे यांनी दिली.

पुण्याच्या मेट्रो स्थानकातील आंदोलनाचा सूत्रधार कोण?

मोफत शिक्षण, नोकऱ्यांसह विविध मागण्यांसाठी मेट्रोच्या रुळावर उतरून आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निलंबित कार्यकर्ता नरेंद्र पावटेकर, त्याचे वडील ज्ञानेश्वर पावटेकर यांच्यासह नऊ जणांना न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित आठ आरोपींच्या पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Pune News: पुण्याच्या मेट्रो स्थानकातील आंदोलनाचा सूत्रधार कोण? पोलिस घेणार शोध; ‘या’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल

अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जे. एस. भाटिया यांनी हा आदेश दिला. पुणे मेट्रोच्या पुणे महापालिका स्थानकाजवळच्या रुळावर पेट्रोल घेऊन आंदोलन करणाऱ्यांनी रुळासह वायरीचे नुकसान केले आहे. मेट्रोसारख्या संवेदनशील ठिकाणीच आंदोलन करण्यामागे आंदोलकांचा घातपाताचा हेतू होता का, त्यांनी मेट्रो स्थानकावर येण्यापूर्वी कोणाला फोन, मेसेज केले होते, तसेच या घटनेमागचा सूत्रधार कोण, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी सोमवारी न्यायालयात सांगितले.

Web Title: Accused beaten one person and firing in air at vadebolhai area nagar road pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 08:38 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune Police

संबंधित बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी
1

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? ड्रेनेजमधून जाणाऱ्या पिण्याच्या पाण्याच्या लाईन बदला; नगरसेवक रवींद्र साळेगावकरांची आयुक्तांकडे मागणी

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
2

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट
3

Police Destroy Seized Drugs: छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मोठी कारवाई! ३४३ किलोहून अधिक गांजाची विल्हेवाट

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
4

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.