crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
इचलकरंजी येथील मंगळवार पेठेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (LCB) पथकाने एका घरावर छापा टाकून बनावट नोटा छापण्याचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. पोलिसांनी तिघांना अटक करून पोलिसांनी २ लाख २४ हजार २०० रुपयांच्या बनावट नोटा आणि ७० हजार ७०० रुपयांचे छपाईसाठी वापरलेले साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या; 23 व्या मजल्यावरून उडी घेऊन संपवलं जीवन
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे अनिकेत विजय शिंदे (२४), राज रमेश सनदी (१९) आणि सोएब अमजद कलावंत (१९) तिघेही रा. इचलकरंजी येथील आहेत. त्यांनी युटूबवरील माहितीच्या आधारे बनावट नोटा छापण्याचा कारखाना सुरु केला होता.
कशी करण्यात आली कारवाई
नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस संतोष बरगे आणि प्रदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्यात आल्यावर त्याच्याकडून बनावट नोटा आढळून आल्या.
चौकशीत त्याने बनावट नोटा स्वतःच्या घरी चापट असल्याची कबुली दिली. त्यानांतर पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकत त्याच्या सहकाऱ्यांना अटक केली. आरोपींनी युट्यूबवरील व्हिडिओ पाहून नोटा छपाईचा संपूर्ण प्रकार शिकल्याची माहिती मिळत आहे. त्यांनी कार्डशिटवर नोटेची प्रत चिकटवून ती स्कॅन करून प्रिंट काढण्याची पद्धत वापरली. यासाठी लागणारे प्रिंटर, स्कॅनर, पेपर आदी साहित्य त्यांनी स्वतंत्रपणे गोळा केले होते. आरोपींनी कमी वेळात आणि श्रमात अधिक पैसे मिळवण्याच्या उद्देशाने हा मार्ग अवलंबल्याचे तपासात उघड झाले आहे.
संतापजनक! जालन्याच्या डीवायएसपींनी आंदोलकाच्या पार्श्वभागावर मारली लाथ
जालन्यातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. जालनाच्या डीवायएसपींनी आंदोलन कर्त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारल्याचे समोर आले आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. जालन्यात एक कुटुंब जिल्ह्यादखिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. यावेळी सुरु असलेल्या आंदोलन स्थळावरून एका कुटुंबाने पंकजा मुंडेंना भेटण्याचा प्रयत्न केला पण यावेळी पोलिसांनी अडवलं. पोलीस उपाधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी संबंधित आंदोलकांच्या कमरेत मागून लाथ मारली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.