गोरेगावमध्ये तरुणीची आत्महत्या (File Photo : Suicide)
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न यांसारख्या घटना घडत आहेत. असे असतानाच आता गोरेगाव पूर्वेतील आरे मिल्क कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या 17 वर्षीय मुलीने 23 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. उंचीवरून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी नैराश्येने ग्रस्त होती आणि अंबानी हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये मुलींनी आत्महत्या करण्याची ही तिसरी घटना आहे. पोलिस या प्रकरणाचाही तपास करत आहेत. आत्महत्या केलेली मुलगी अकरावीची विद्यार्थिनी होती. एका प्रतिष्ठित महाविद्यालयात शिकत होती. तिचे वडील एक प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. घटनेच्या वेळी ती तिच्या बेडरूममध्ये होती, तर तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते. तिने आत्महत्या करण्यापूर्वी कोणतीही सुसाईड नोट सोडलेली नाही.
हेदेखील वाचा : Mumbai News: मित्रांच्या ग्रुपला धबधब्यावर पिकनिकला जाणं बेतलं जीवावर, डोहात दोन जणांचा बुडून मृत्यू
पीडिता तिच्या बेडरूममध्ये अभ्यासाला बसली होती. तिची आई आणि आजी-आजोबा घरी होते आणि वडील कामावर गेले होते. आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांनी सांगितले की, या प्रकरणात अपघाती मृत्यू (एडीआर) नोंदवण्यात आला आहे.
आत्महत्येची तिसरी घटना
गोरेगावमधील ओबेरॉय कॉम्प्लेक्स तरुणांमध्ये आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत या कॉम्प्लेक्सच्या वेगवेगळ्या इमारतींमधून तीन जणांनी आत्महत्या केल्या आहेत. २ जुलै २०२५ रोजी अनंत द्विवेदी (वय २२) याने ओबेरॉय ई-स्क्वेअर इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. २८ मे २०२५ रोजी १७ वर्षीय शाळकरी मुलीने त्याच ओबेरॉय कॉम्प्लेक्सच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.