शिक्रापूर: शिरुर येथील महिलेची गुलाम शेख याच्या सोबत ओळख झाल्यानंतर गुलाम याने महिलेशी ओळख वाढवून महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यांनंतर महिलेला वेळोवेळी शिक्रापूर, टिंगरेनगर येथील हॉटेलवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर महिलेने लग्नाबाबत चर्चा केली असता गुलाम याने महिलेला शिवीगाळ, दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पिडीत महिलेने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी गुलाम हुसेन शेख रा. भरत ढाबा जवळ धानोरी पुणे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे हे करत आहे.
नोकरी लावण्याचे आमिष देत महिलेवर केले वारंवार अत्याचार
नवी मुंबई येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष देत पीडित महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ५५ वर्षीय सिराज इद्रीस चौधरी याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे. वाशी पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीने पीडित महिलेला दुबईत जास्त पगाराच्या नोकरीचे अमिश देत तिच्या कामाच्या ठिकाणी जबरदस्तीने बलात्कार केला. आरोपी इद्रिस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.
नराधम आरोपीने पीडित महिलेला दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देतो असे आमिष दिले. काही दिवसांनी नोकरी मिळेल असं अमिश दाखवत त्याने या पीडित महिलेवर वारंवार अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. १७ जून ला पीडित महिलेने तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार, या वर्षी जानेवारी ते मार्च दरम्यान महिलेला या त्रासाला सामोरे जावे लागले असे वाशी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने याबाबत वाशी पोलीस ठाण्यात तक्रार देताच वाशी पोलिसांनी आरोपी सिराज इद्रीस चौधरी याला अटक केली असून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. इद्रीस चौधरी याच्यावर या आधी देखील गुन्हे दाखल असल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं असल्याची माहिती तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब सांगळे यांनी दिली आहे. दरम्यान, उरण तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उरण तालुक्यातील JNPT बंदरातून देशात बेकायदेशीर सिगारेटचा मारा करणाऱ्यांच्या महसूल गुप्तचर संचालनालयाने मुसक्या आवळल्या आहेत.