तीन तोळ्यांची सोनसाखळी लंपास; सासरच्यांचा थेट जावयावर संशय, पोलिसांतही तक्रार
बुलडाणा : तब्बल 22 वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली. या आरोपीला ठाण्यातून अटक झाली आहे. खामगाव अतिरिक्त सत्र न्यायालयाने खून प्रकरणात आरोपीला शिक्षा ठोठावली होती. तेव्हापासून तो फरार होता. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी कामगिरी करत या आरोपीला अटक केली.
हेदेखील वाचा : मणिपूरमध्ये पुन्हा इंटरनेट बंदी; पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा आणखी पाच दिवस राहणार ठप्प
2022 पासून हा आरोपी फरार होता. 9 सप्टेंबर 1995 रोजी फिर्यादी राजकुमार तिवारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाळू बाबुराव काळे ऊर्फ पोपट भाऊसाहेब खोले (रा. राक्षसभुवन ता. पाटोदा, जि. बीड) याच्याविरुद्ध हिवरखेड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन आरोपीविरुद्ध अतिरिक्त सत्र न्यायालय, खामगाव येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. अतिरिक्त सत्र न्यायालय, खामगाव यांनी 1 ऑगस्ट 2002 रोजी आरोपीला दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर आरोपी हा उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे अपीलमध्ये गेला. तेव्हापासून फरार होता.
सत्र न्यायालयाने आरोपीच्या अटकेसाठी अटक वॉरंट काढले होते. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह इतर पोलिस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाची नेमणूक करण्यात आली. पोलीस आरोपीचा शोध घेत असल्याची कुणकुण लागल्याने तो मुक्कामाचे ठिकाण बदलत होता. गोपनीय माहितीनुसार, आरोपी हा मुंबई येथे वास्तव्यास असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले.
लोकांना विचारपूस केल्यावर आरोपी हा सन 2017 मध्ये परिसरात ऑटोरिक्षा चालवित असल्याचे समजले. सदर प्रकरणी, तांत्रिक विष्लेषण विभाग बुलडाणा यांची मदत घेऊन सन 2017 वर्षी आरोपीच्या संपर्कात असलेल्या लोकांची माहिती घेऊन ठावठिकाणा प्राप्त करण्यात आला. शनिवारी (दि. 14) काशीगाव परिसरात फरार आरोपी मिळून आला. त्याची पूर्णपणे ओळख पटवून, त्यास ताब्यात घेण्यात आले.
हेदेखील वाचा : ‘रुमवर ये’ एअर फोर्सच्या अधिकारी महिलेला रात्री दोन वाजता फोन; रुमवर जाताच…