Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ahilyanagar Crime: आलिशान कार, पांढरी पोती अन् 28 लाखांचा गुटखा; नगरमध्ये पोलिसांची धडाकेबाज कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. विक्रीसाठी नेला जाणारा 28 लाख 88 हजार रुपयांचा गुटखा आलिशान कारमधून जप्त करण्यात आला. अमोल जाधव याच्यासह संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून गुटखा कुठून आणला आणि कुठे विकला जाणार होता, याचा तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jul 01, 2026 | 01:30 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

• श्रीगोंदा तालुक्यात पोलिसांनी गुटखा तस्करीवर कारवाई केली.
• कारवाईत गुटखा, वाहने, मोबाईल आणि रोकड असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
• आरोपी अमोल जाधवविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

अहिल्यानगर: राज्यात सध्या एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे झाल्या पासून कारवाई चा धडाका सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी दूध, इतर खाद्यपदार्थ भेसळ करून विकले जात होते. काही ठिकाणी दुधात, पनीर आणि इतर पदार्थमध्ये केमिकल मिक्स केल जायचं. मात्र आता संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशासनाकडून जोरदार कारवाई सुरू आहे. नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई मध्ये जवळपास २८ लाख रुपयांचा गुटखा एका आलिशान कार मधून जप्त करण्यात आला आहे. हा गुटखा विक्रीसाठी नेला जात होता. श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी इथल्या अमोल जाधव याने हा माल खरेदी केला होता. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई करत माल जप्त केला आहे.

Ketan Agarwal Muder Case: सीसीटीव्हीतील संशयित चेतनच? लोहगडावर सीन रिक्रिएशन, गेट ॲनॅलिसिसमधून उलगडा होणार

स्थानिक गुन्हे शाखेने वॉच ठेवत केली कारवाई

स्थायिक गुन्हे शाखेला अमोल जाधव हा शरीराला अपाय होणाऱ्या गुटख्याची विक्री करणार हे याची माहिती मिळाली होती. तेव्हा स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्या घराच्या जवळ माहिती घेण्यासाठी पेट्रोलिंग वाढवल होत. जेव्हा तो गुटखा विक्रीसाठी घेऊन जात आहे. याची माहिती मिळाली तेव्हा तीन जण एका आलिशान कारमध्ये पांढऱ्या पोत्यात काही वस्तू ठेवत होते. जेव्हा धाड टाकून कारवाई केली तेव्हा सुगंधित गुटखा विक्रीसाठी घेऊन जाणार होता अशी माहिती प्राप्त झाली. अमोल जाधव याच्या कडून जवळपास २८ लाख ८८ हजार ३३० रुपये एवढ्या किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

अमोल जाधव करून गुन्हे शाखेला काय काय मिळाल?

अमोल जाधव करून त्यांना ६ लाख ३ हजार २०० रुपये किमतीचा आरएमडी, गुटखा व्ही १ तर दोन चार चाकी वाहने, ३० हजार रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल असा एकूण २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुटखा विक्रीवर बंदी असताना पण त्याने अवैध रीतीने गुटखा विक्री करण्यास तो जात होता. या प्रकरणात आता त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमोल जाधव यांच्या कडून अधिकचा तपास केला जात आहे. अमोल जाधव हा गुटखा कुठून आणत होता? त्याची विक्री कुठे केली जाणार होती? त्याचे काही ग्राहक आहेत का? याची माहिती आता गुन्हे शाखा करत आहे. मात्र राज्यात एफडीएच्या कारवाई नंतर स्थानिक पोलीस पण अवैध धंद्यावर लक्ष ठेवून आहेत.

Jalna Accident News: जालन्यात भीषण अपघात; भरधाव कारने तलाठ्याला चिरडलं, CCTV मध्ये कैद झाला थरार

💡

Frequently Asked Questions

  • Que: अहिल्यानगरमध्ये किती रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला?

    Ans: सुमारे 28 लाख 88 हजार 330 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला.

  • Que: ही कारवाई कुठे करण्यात आली?

    Ans: श्रीगोंदा तालुक्यातील मुंढेकरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: स्थानिक गुन्हे शाखेने गुटखा जप्त करून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Ahilyanagar crime luxury car white sacks and gutkha worth 28 lakh police conduct a high impact raid in nagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 01:24 PM

Topics:  

  • Ahilyanagar
  • crime

संबंधित बातम्या

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी
1

Pradeep Purnekar हत्या प्रकरण तापले! पूर्णेकरांचे पार्थिव ठाण्यात; कुटुंबीय-कार्यकर्ते आक्रमक, सर्व आरोपींच्या अटकेची मागणी

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ
2

Ahilyanagar Bank Election: बँक बिनविरोध करण्याचे मनसुबे धुळीस? अहिल्यानगरमध्ये तब्बल ५४१ उमेदवारी अर्जांमुळे खळबळ

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम
3

Tridha Concert: अहिल्यानगरमध्ये रंगणार ‘त्रिधा’ची विशेष मैफल; गायन, वादन अन् नृत्याचा अनोखा संगम

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात
4

Indian Coast Guard: अरबी समुद्रात संशयित इराणी बोटीचा थरारक पाठलाग; 526 किलो हेरॉईन-मेथामफेटामाइनसह 5 पाकिस्तानी ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.