• मंठा रोडवरील कोठारी हिल्स भागात भरधाव कारने तलाठ्याला धडक दिली.
• तलाठी दिगंबर कुरेवाड यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
• पोलिसांनी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल केला.
जालना : जालना येथून एक अपघात झाल्याचे समोर आले आहे. जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स भागामध्ये भरधाव कारणे जोरदार धडक दिल्यामुळे भीषण आघात झाल्याचे समोर आले आहे. यात रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या एका तलाठ्याला भरधाव कारने अक्षरशः चिरडलं. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेचा थरार CCTV मध्ये कैद झाला आहे.
काय घडलं नेमकं?
मृत्यू झालेल्या तलाठ्याचे नाव दिगंबर कुरेवाड असे आहे. ते आपले कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर घरी जात होते. त्यावेळी मंठा रोडवरील कोठारी हिल्स भागामध्ये भरधाव कारने जोरदार धडक दिली. यात दिगंबर हे अक्षरशः चिरडले गेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण अपघाताचे CCTV दृश्य समोर आले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झालं असून अधिक तपास सध्या पोलीस करत आहे.
या प्रकरणी निष्काळजीपणाने कार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कार चालका विरोधात तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र या अपघाताने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
‘त्या मला मारून टाकतील’ भीती ठरली खरी? पत्नी आणि चार मुलींनी मिळून वडिलांची केली हत्या
जालना येथून एक धक्कादायक घटना समोर आली. पत्नी आणि चार मुलींनी मिळून आपल्या वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना जाफराबाद तालुक्यातील टाकळी येथे घडली. या प्रकरणी मृतकाच्या सावत्र भावाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पत्नीसह चार मुलींविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मृतकाचे नाव शालिकराम शिवाजी दांडगे (वय ४०) असे आहे. शालिकराम दांडगे हे लग्नानंतर सासरच्या जागेत टाकळी येथे घर बांधून पत्नी आणि मुलींसह राहत होते. काही दिवसांपासून कुटुंबात वाद सुरू होते. याच वादातून शालिकराम यांची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे.
Ans: जालना शहरातील मंठा रोडवरील कोठारी हिल्स परिसरात हा अपघात झाला.
Ans: अंबड तालुक्यातील तलाठी दिगंबर कुरेवाड यांचा मृत्यू झाला.
Ans: पोलिसांनी कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.






