
फोटो सौजन्य: Gemini
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस नाईक संदीप साठे हे त्यांच्या सेक्टर ड्युटीवर कार्यरत असताना, त्यांना नाईट अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी मध्यरात्री ११:३० वाजता भोसले लॉनच्या पाठीमागे डीजे सुरू असल्याची माहिती दिली, दारू पिऊन काही लोक वाद घालत असल्याचीही माहिती मिळाली. त्यानुसार साठे व सहकारी घटनास्थळी पोहोचले.
Ahilyanagar News: आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्याकडून कांदा व्यापाराची तब्बल 81 लाखांची फसवणूक
डीजेच्या तालावर काहीजण नाचत असताना देशमुख यांनी डीजे बंद करून शांतता राखण्याची सूचना केली. मात्र, काही युवकांनी देशमुख यांच्याशी अरेरावी करत त्यांच्याच अंगावर धाव घेतली, इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासोबतही झटापट करण्यात आली आणि पोलिसांना शिवीगाळही करण्यात आली. यावेळी,वधूने पोलिसांसमोर येऊन, आम्ही डीजे बंद करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे आव्हान दिले आणि ती तिच्या मोबाइलने सादर घटना शूट करू लागली. तिने “मी चित्रीकरण करत आहे आणि माझ्या भावाना सांगितले तर ते तुम्हाला सोडणार नाहीत, अशी धमकी दिली, त्यानंतर तिच्यासह इतर सात ते आठ युवकांनी आणि काही महिलांनी पोलिसांशी झटापट केली.
यानंतर पोलिसांनी वधू मुलीसह सहा आरोपींना ताब्यात घेत वाजवी बळाचा वापर करून डीजेचा टेम्पो आणि जनरेटर जप्त केले. चौकशीत डीजे मालक विकी माने हा देखील तेथे उपस्थित होता आणि त्यानेही पोलिसांशी अरेरावी करून नंतर तो पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांचे शासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा आणल्याप्रकरणी आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहीत भालेराव, इन्तीयाज बागवान, ईश्वर धिवर, हर्षल गायकवाड, तुषार घायमुक्ते, मच्छींद्र घायमुक्ते, विकी माने आणि हळदीची वधू यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.